पोलीस असल्याच्या बतावणीने चोरट्यांनी तरुणाला मारहाण करुन त्याच्याकडील मोबाइल संच हिसकावून नेल्याची घटना कात्रज-कोंढवा रस्त्यावर घडली. तरुणाकडील मोबाइल संच हिसकावून चोरटे मोटारीतून पसार झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याबाबत संदीप म्हस्के (वय २२, रा. सासवड, ता. पुरंदर) याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संदीप कात्रज-कोंढवा रस्त्यावरील एकता चौकात थांबला होता. त्या वेळी मोटारीतून आलेल्या चोरट्यांनी त्याला अडवले. कोठे निघाला आहे, अशी विचारणा करुन त्याला धमकावण्यास सुरुवात केली.

चोरट्यांनी पोलीस असल्याची बता‌वणी केली. त्यानंतर चोरट्यांनी त्याला मारहाण करुन दहा हजारांचा मोबाइल संच हिसकावून नेला. घाबरलेल्या संदीपने पोलिसांकडे तक्रार दिली. चोरटे मोटारीतून पसार झाले असून पोलीस उपनिरीक्षक ढमे तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A young man was robbed by a fake policeman pune print news amy
First published on: 16-08-2022 at 11:06 IST