पुणे : दुचाकीस्वार तरुणीचा विनयभंग ; दुचाकीस्वार तरुणावर गुन्हा

दुचाकीस्वार तरुणीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना लोहगाव-धानोरी रस्त्यावर घडली.

तरुणीचा विनयभंग ,rape
( संग्रहित छायाचित्र )

लोहगाव परिसरातील घटना

दुचाकीस्वार तरुणीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना लोहगाव-धानोरी रस्त्यावर घडली. या प्रकरणी एका दुचाकीस्वार तरुणाच्या विरोधात विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका दुचाकीस्वार तरुणीने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार तरुणी मुंबईतील एका खासगी कंपनीत काम करते. ती रेल्वेने मुंबईला जाणार होती.

पहाटे ती घरातून बाहेर पडली. लोहगाव- धानोरी रस्त्यावरुन दुचाकीस्वार तरुणी जात होती. त्यावेळी पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वार तरुणाने दुचाकीस्वार तरुणीचा विनयभंग केला. त्यानंतर तो पसार झाला. घाबरलेल्या तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस हवालदार मोटे तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A young woman raped crime young man riding biken lohgaon area pune print news amy

Next Story
पुण्यातील शिवसेना शहर समन्वयक राजाभाऊ भिलारे, एकनाथ शिंदेंच्या गटात!
फोटो गॅलरी