A youth carrying a pistol caught police caught up pune print news ysh 95 | Loksatta

पुणे: पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला विमाननगर भागात पकडले

संतोष शंकर गुंजाळ (वय २६ रा. दगडी हौदाजवळ माळवाडी, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

पुणे: पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला विमाननगर भागात पकडले
पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला विमाननगर भागात पकडले

पुणे: देशी बनावटीचे पिस्तूल बाळगल्या प्रकरणी एकाला विमानतळ पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली. संतोष शंकर गुंजाळ (वय २६ रा. दगडी हौदाजवळ माळवाडी, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. विमाननगर भागात गुंजाळ थांबला असून त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती विमानतळ पोलीस ठाण्यातील कर्मचारी गिरीश नाणेकर आणि सचिन जाधव यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून गुंजाळला पकडले. त्याची झडती घेण्यात आली. तेव्हा त्याच्याकडे पिस्तूल आणि काडतुसे सापडली. पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहायक आयुक्त आरती बनसाेडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मंगेश जगताप, उपनिरीक्षक रवींद्र ढावरे, अविनाश शेवाळे, सचिन कदम आदींनी ही कारवाई केली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 14:07 IST
Next Story
पुणे: राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर रिक्षा संघटनांचे पदाधिकारी आपापसात भिडले, नेमकं झालं काय?