पुणे : येरवडा कारागृहातून बाहेर पडलेल्या मित्राला भेटण्यासाठी आलेल्या तरुणांना टोळक्याने अडवून मारहाण केल्याची घटना घडली. टोळक्याने कारागृहासमोर दहशत माजविली. याप्रकरणी आठ जणांविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.याप्रकरणी मयूर उर्फ यम सरोदे (रा. भोसरी), ज्ञानेश्वर लोंढे, यदू (तिघे रा. गोडाऊनचौक, भोसरी) यांच्यासह आठ जणंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत ऋषिकेश सुनील घोरपडे (वय १८, रा. मोहननगर, भोसरी) याने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून लोंढेला अटक करण्यात आली आहे.
घोरपडे आणि आरोपी सरोद, लोंढे, यदू भोसरीत राहायला आहेत. ऋषीकेशच्या मित्राची येरवडा कारागृहातून सुटका हाेणार हाेती. त्याला घेऊन जाण्यासाठी ऋषीकेश आणि मित्र कारागृहाबाहेर थांबले होते. ऋषीकेशच्या मागावर आरोपी होते. आरोपींनी ऋषीकेशला धमकी दिली. त्याला धमकावून दुचाकीवर बसविले. येरवडा मनोरुग्णालय परिसरात ऋषीकेशला मारहाण करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक टकले तपास करत आहेत.