पुणे : आम आदमी पक्षाची स्वराज्य यात्रा येत्या शुक्रवारी (२ जून) पुण्यात दाखल होणार आहे. शुक्रवारी सायंकाळी चार वाजता आझम कॅम्पस येथून फेरीला सुरूवात होणार असून सायंकाळी सहा वाजता सणस मैदाना शेजारी जाहीर सभा होणार आहे.  पक्षाचे राष्ट्रीय सह सचिव, महाराष्ट्र राज्य सहप्रभारी गोपाल इटालिया मार्गदर्शन करणार आहेत. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> पुणे: राज्यात १ जुलैपासून मिळणार नवीन लायसन्स; स्मार्ट कार्ड टंचाईवर सरकारचा निर्णय

आम आदमी पक्षाचे शहर उपाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांनी ही माहिती बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. एकनाथ ढोले, किशोर मुजुमदार, गणेश ढमाले, आनंद अंकुश, सुजीत अग्रवाल आणि धनंज बेनकर यावेळी उपस्थित होते.

पंढरपूर येथून २८ मे पासून स्वराज्य यात्रेला प्रारंभ झाला आहे. येत्या सहा जून रोजी रायगड येथे यात्रेची सांगता होणार आहे. दिल्ली आणि पंजाय सरकारच्या विनामूल्य शिक्षण, आरोग्य, वीज, पाणी, महिलांना विनामूल्य प्रवास अशा कामांची माहिती यात्रेच्या निमित्ताने नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे.

हेही वाचा >>> आधार वैधतेसाठी १५ जूनची मुदत; विद्यार्थी, शिक्षकांना दिलासा

पुण्यामध्ये आझम कॅम्पस पासन फेरीला सुरुवात होईल. लक्ष्मी रस्ता, टिळक चौक, सणस मैदान असा या फेरीचा मार्ग आहे. सायंकाळी सहा वाजता फेरीचे रूपांतर जाहीर सभेत होणार असून महाराष्ट्र राज्य सहप्रभारी गोपाल इटालिया मार्गदर्शन करणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत स्वराज यात्रेचा करिष्मा दिसून येईल, असे डाॅ. अभिजीत मोरे यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aam aadmi party swaraj yatra will enter in pune tomorrow pune print news apk 13 zws
First published on: 01-06-2023 at 10:19 IST