पुणे: आखाती देशात गेलेल्या घरेलू कामगारांच्या सुटकेसाठी ‘आप’चे प्रयत्न | AAP party efforts for the release of workers who have gone to Gulf countries pune print news amy 95 | Loksatta

पुणे: आखाती देशात गेलेल्या घरेलू कामगारांच्या सुटकेसाठी ‘आप’चे प्रयत्न

आम आदमी पार्टीच्या प्रयत्नामुळे ओमान देशात अडकलेल्या पुण्याच्या पूजा कसबे यांच्यासह ४२ घरेलू कामगार महिला भारतात परतल्या आहेत.

पुणे: आखाती देशात गेलेल्या घरेलू कामगारांच्या सुटकेसाठी ‘आप’चे प्रयत्न
आम आदमी पक्ष

आम आदमी पार्टीच्या प्रयत्नामुळे ओमान देशात अडकलेल्या पुण्याच्या पूजा कसबे यांच्यासह ४२ घरेलू कामगार महिला भारतात परतल्या आहेत. आणखी ३८ महिलांची भारतात परतण्याची प्रक्रिया सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आखाती देशात जाणाऱ्या घर कामगार महिलांची फसवणूक रोखण्यासाठी आपकडून विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.

हेही वाचा >>>पुणे: मनोरुग्णालयाच्या जागेवरील बेकायदा झोपड्या हटविण्याचे आदेश

आम आदमी पक्षाचे राज्य संघटक आणि शहराध्यक्ष विजय कुंभार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, की भारतातील मध्यस्थांच्या भूलथापांना बळी पडत पुण्यातील पूजा नितीन कसबे या मोठ्या वेतनाच्या प्रलोभनाने ओमान देशात घरकाम करण्यासाठी जुलै २०२२ मध्ये गेल्या. मात्र, तिथे गेल्यावर मध्यस्थाने फसवणूक केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांचे पारपत्र तेथील मालकाने जप्त केले. मोठ्या मुश्किलीने ऑगस्ट महिन्यात पूजा तेथील मालकाच्या बंगल्यातून पळून भारतीय दूतावासापर्यंत पोहोचल्या. या ठिकाणी त्या तीन महिन्याहून अधिक काळ अडकून पडल्या होत्या. याच ठिकाणी फसवणूक झालेल्या सुमारे ८० घरकामगार महिला अडकून पडल्या होत्या.

हेही वाचा >>>पुण्यात सुशोभीकरणासाठी घेणार उद्योजक, बँकांची मदत; विक्रम कुमार यांची माहिती

आपकडून ओमानमधील भारतीय उद्योजकांशी संपर्क साधून तसेच मस्कत येथील भारतीय दूतावासातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून पाठपुरावा करण्यात आला. केवळ पूजा कसबेच नव्हे तर भारतीय दुतावासाच्या मस्कत येथे अडकून पडलेल्या ८० पैकी तब्बल ४२ घरेलू कामगार महिला नुकत्याच भारतात परतल्या आहेत. अजून ३८ घरेलू कामगार महिलांना भारतामध्ये परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे, असेही कुंभार यांनी सांगितले.आपचे डॉ. अभिजित मोरे, अब्बास खान, निरंजन अडागळे, श्रद्धा गायकवाड या वेळी उपस्थित होत्या.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 11:56 IST
Next Story
पुणे: मनोरुग्णालयाच्या जागेवरील बेकायदा झोपड्या हटविण्याचे आदेश