लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाच्या (एएफएमसी) संचालक आणि प्रमुखपदी सर्जन व्हाइस ॲडमिरल आरती सरीन यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी नुकताच आपला पदभार स्वीकारला.

हेही वाचा >>>‘पीएमआरडीए’च्या घरकुल योजनेसाठी अर्जाची मुदत वाढवली ; १८ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची संधी

Surrogate Mother Case, First in nagpur, Approved, Surrogacy Act 2021, District Medical Board,
नवीन कायद्यानुसार नागपुरात पहिल्या ‘सरोगेट मदर’ प्रकरणास मंजुरी
bjp candidate for lok sabha election in pune will be decided by party workers
पुण्यात भाजपाचा उमेदवार पदाधिकाऱ्यांकडून होणार निश्चित
Gutkha smuggler Israr Mansoori in police custody nashik
गुटखा तस्कर इसरार मन्सुरी यास पोलीस कोठडी
pm Modi Yavatmal
पंतप्रधानांची यवतमाळमध्ये सभा, पोलिसांनी कशासाठी बजावली नोटीस?

व्हाइस ॲडमिरल आरती सरीन या एएफएमसीच्या माजी विद्यार्थी असून २६ डिसेंबर १९८५ मध्ये त्यांची सशस्त्र वैद्यकीय सेवांमध्ये (एएफएमएस) नियुक्ती करण्यात आली. त्यांनी पुण्यातील एएफएमसीमधून रेडिओडायग्नोसिस आणि मुंबई येथील टाटा मेमोरिअल हॉस्पिटलमधून रेडिएशन ऑन्कोलॉजीमधील विशेष प्रावीण्यासह पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. याव्यतिरिक्त पिट्सबर्ग विद्यापीठात गामा नाईफ सर्जरीचे प्रशिक्षण सरीन यांनी पूर्ण केले आहे. 

हेही वाचा >>>कोरेगाव पार्क भागात मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय ; गुन्हे शाखेकडून दोघांना अटक

आपल्या ३७ वर्षांच्या सेवा कार्यकाळात त्यांनी महत्त्वाच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय नियुक्त्यांवर जबाबदारी पार पाडली आहे. दिल्लीतील आर आर लष्करी रुग्णालय आणि कमांड रुग्णालय, पुण्यातील एएफएमसी येथील रेडिएशन ऑन्कोलॉजी विभागाच्या प्रमुख, मुंबई येथील आयएनएस अश्विनीच्या कमांडंट या पदांचा समावेश आहे. उत्कृष्ट कारकिर्दीसाठी त्यांना २००१ मध्ये नेव्हल स्टाफ कमेंडेशन, २०१३ मध्ये जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ कमेंडेशन, २०१७ मध्ये ‘आर्मी स्टाफ कमेंडेशन’ आणि २०२१ मध्ये विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.