सारसबागेत बेवारस पिशवी सापडल्यानंतर बुधवारी सायंकाळी घबराट उडाली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर बाँब शाेधक नाशक पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पिशवीची तपासणी केली. तेव्हा पिशवीत संशयास्पद वस्तू आढळून आली.
हेही वाचा >>> पुणे : नायलाॅन मांजामुळे अग्निशमन दलाचा जवान जखमी; गळ्याला दुखापत; गुलटेकडीतील घटना
सारसबागेत बुधवारी सायंकाळी बेवारस पिशवी सापडली. या घटनेची माहिती मिळताच स्वारगेट पोलीस ठाण्यातील पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. सारसबागेचा परिसर त्वरीत मोकळा करण्यात आला. बाँब शोधक नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले. पिशवीची पाहणी करण्यात आली. तेव्हा पिशवीत कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही. पिशवीत बाँब असल्याची अफवा पसरल्याने सारबाग परिसरात घबराट उडाली.
जी २० परिषदेसाठी शहरात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सारबागेत बेवारस पिशवी सापडल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांची धावपळ उडाली.