बालेवाडीतील कुटुंबाकडे आठ दिवसांनंतर मुलगा सुखरूप परतला; अपहरणकर्ते पसार

Pune police checking, gangsters gun, 2 Incidents of Gun Violence, Gun Violence Reported in pune, firing in hadapsar, firing on jangli maharaj road, firing in pune, violence in pune, pune police, crime news, marathi news,
पुणे : गुंडांच्या झाडाझडतीनंतर शहरात गोळीबाराच्या दोन घटना,जंगली महाराज रस्ता, हडपसर भागात गोळीबार
Nashik, Girl died falling into bucket,
नाशिक : पाण्याच्या बादलीत पडून बालिकेचा मृत्यू
Villager died in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात गावकरी ठार, सहा वर्षांत ४२१ जण मृत्युमुखी
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक

पुणे : बाणेर-बालेवाडी येथून गेल्या आठवड्यात भर दिवसा चार वर्षांच्या चिमुकल्याचे अपहरण झाले. पोलीस यंत्रणेपुढे कोडे निर्माण करणाऱ्या घटनेकडे साºया राज्याचे सर्वाधिक लक्ष गेले, ते त्या मुलाच्या पित्याने समाजमाध्यमांवरून अपहरणकर्त्यांना केलेल्या आर्जवामुळे. ‘मुलास इजा करू नका, त्याला ताप आल्यास विशिष्ट औषध द्या’ या त्यांच्या दररोज केल्या जाणाऱ्या आर्त विलापामुळे या बापाच्या संवेदनांशी समाजमन एकरूप झाले. बुधवारी दुपारी या चिमुकल्याची  अचानक सुटका झाल्यामुळे या कुटुंबासह सर्वांचा जीव भांड्यात पडला.

स्वर्णव सतीश चव्हाण असे या चिमुकल्याचे नाव.  पुनावळे येथे बुधवारी तो सापडला. ११ जानेवारी रोजी त्याचे अपहरण झाले होते.   स्वर्णवला सोडण्यासाठी त्याचा मामा दुचाकीवरून निघाला होता. बाणेर-बालेवाडी रस्त्यावरून दुचाकीवरून आलेल्या अपहरणकर्त्यांनी दुचाकीस्वार मामाला अडवून चार वर्षांच्या स्वर्णवचा ताबा घेतला. काही कळायच्या आत स्वर्णवला घेऊन अपहरणकर्ते पसार झाले.

 डॉ. सतीश चव्हाण आणि त्यांची पत्नी यांनी या घटनेचा धसका घेतला. पोलिसांनी अपहरणकर्त्यांना पकडण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लावल्या. मात्र कोणतेही धागेदोरे सापडत नसल्यामुळे हे दाम्पत्य निराशेच्या गर्तेत गेले. डॉ. चव्हाण यांनी समाजमाध्यमांवरून अपहरणकर्त्यांकडे आपल्या मुलाला सोडून देण्याची विनंती केली. त्यांच्या या आर्जवांमुळे राज्यभरातून  स्वर्णवच्या सुटकेसाठी प्रार्थना केली जात होती.

बुधवारी दुपारी एकच्या सुमारास पिंपरीतील पुनावळे परिसरात एका बांधकाम प्रकल्पावर अपहरणकर्ता आला. तेथील रखवालदाराकडे त्याने स्वर्णवला त्याने सोपविले. मुलाला दहा मिनिटे ठेवा, लगेच येतो, असे सांगून अपहरणकर्ता पसार झाला. दहा मिनिटांनी अपहरणकर्ता आला नाही. रखवालादाराकडे पिशवीही देण्यात आली होती. पिशवीतील एका कागदावर स्वर्णवच्या कुटुंबीयांचा मोबाइल क्रमांक होता. त्या क्रमांकावर रखवालदाराने संपर्क साधला आणि मुलाबाबतची माहिती दिली. त्यानंतर चव्हाण दाम्पत्य तेथे पोहोचले. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. स्वर्णवला पाहताच चव्हाण कुटुंबीयांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

डॉ. चव्हाण यांची पत्नी वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून त्यांची रोगनिदान प्रयोगशाळाही आहे. 

शोध कसा लागला?

अपहरणकर्त्याने पुनावळे येथील बांधकाम प्रकल्पाजवळ स्वर्णवला आणून सोडले. या अपहरणकर्त्यांना पकडण्यासाठी आठशेहून अधिक पोलीसांची यंत्रणा आठ दिवसांपासून लढत होती. मात्र त्यांच्या हाती कोणताही तपशील आला नाही.

स्वर्णवची प्रकृती उत्तम…

अपहरण प्रकरण संवेदनशील होते. सर्व बाबी विचारात घेऊन तपास करण्यात येत होता. अखेर चार वर्षांचा स्वर्णव सापडला. पोलिसांनी त्याची वैद्यकीय तपासणी केली असून त्याची प्रकृती उत्तम आहे. अपहरणकर्त्यांचा माग काढण्यात येत असून सर्व बाबी विचारात घेऊन तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.