पुणे : ‘आधी ध्येय ठरवा आणि मग त्यावर अविरत काम करा…’ रतन टाटा यांनी तीन वर्षांपूर्वी दिलेला हा मंत्र पुण्याचे अभिजित मकाशीर आणि त्यांची मुलगी अदिश्री यांना इतकी ऊर्जा देऊन गेला होता, की अदिश्रीने हा कानमंत्र पक्का लक्षात ठेवून मानसशास्त्रातील करिअर नक्की केले आणि आज ती त्या मानसशास्त्राचे पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेते आहे. टाटा यांच्या निधनानंतर अभिजित यांना त्यांचे हे शब्द पुन्हा आठवून गहिवरायला झाले…

आपल्या कंपनीतील एक जुना कर्मचारी आजारी आहे, असे कळल्यावर रतन टाटा स्वत: मुंबईहून त्यांना भेटायला पुण्यात आले होते. ती तारीख होती ३ जानेवारी २०२१. कोथरूडमधील गांधी भवनशेजारील वूडलँड सोसायटीत राहणाऱ्या या कर्मचाऱ्याची भेट घेऊन निघत असताना, त्याच सोसायटीत राहणारे मकाशीर व त्यांची मुलगी अदिश्री यांची अगदी योगायोगाने टाटा यांच्याशी भेट झाली होती. त्या वेळी टाटा आवर्जून थांबले आणि त्यांनी या बापलेकीशी काही मिनिटे छान गप्पाही मारल्या.

Shyam Manav comment on Ladki Bahin Yojana,
‘लाडकी बहीण योजना अर्थव्यवस्थेला चालना देणारी’, काँग्रेसच्या सभेत अंनिसचे श्याम मानव म्हणाले….
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
ajay devgan
“तो कारमध्ये एक हॉकी स्टिक…”, रोहित शेट्टीने अजय देवगणबाबत केला खुलासा; अभिनेता म्हणाला, “आता मी…”
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
Amit Shah IMP Statement about CM Post
Amit Shah : ‘महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण?’ अमित शाह म्हणाले, “नेतृत्व…”
Asaduddin Owaisi Statement over Modi
Asaduddin Owaisi : “आंबेडकर जिंदा है तो गोडसे…”, असदुद्दीन ओवैसींची पंतप्रधान मोदींच्या विधानावर जोरदार टीका
Amit Shah made special mention of Devendra Fadnavis in speech in shirala
अमित शहांनी फोन काढला आणि थेट फडणवीसांना लावला… म्हणाले, “पुन्हा…”
Sachin Pilgaonkar
नवरा माझा नवसाचा २’ने थिएटरमध्ये ५० दिवस पूर्ण केल्यानंतर श्रियाची सचिन पिळगांवकरांसाठी खास पोस्ट; म्हणाली, “रॉकस्टार मला…”

आणखी वाचा-शाळेच्या आवारात मुलावर अत्याचार, अनैसर्गिक कृत्य प्रकरणी शाळकरी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

‘त्या दिवशी मी दळण आणायला बाहेर पडलो होतो. ते घेऊन सोसायटीत आलो, तेव्हा दोन-तीन मोठ्या गाड्या सोसायटीत दिसल्या. सोसायटीचा अध्यक्ष असल्याने त्या कोणाच्या आहेत, याची चौकशी करायला गेलो, तेव्हा लिफ्टपाशी जाऊन थबकलोच. तेथे चक्क रतन टाटा लिफ्टची वाट बघत उभे होते. मी त्यांना नमस्कार केला, तेही माझ्याकडे पाहून हसले. लिफ्ट आल्यावर ते वरच्या मजल्यावर त्यांच्या जुन्या सहकाऱ्याला भेटायला गेले…’ मकाशीर ‘लोकसत्ता’ला आपला अनुभव सांगत होते…

मकाशीर म्हणाले, ‘मी आश्चर्याच्या धक्क्यातून सावरून त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांच्या येण्याचे कारण विचारले, तेव्हा ते त्यांच्या जुन्या सहकाऱ्याला भेटायला आल्याचे कळले. त्या दिवशी इतक्या मोठ्या माणसात वसलेली मैत्री आणि त्या मैत्रीत वसलेला माणूस मला दिसल्याची जाणीव होऊन कृतकृत्य वाटले. ‘ते परत जाताना, त्यांच्याशी दोन मिनिटे बोलू द्या,’ अशी विनंती मी त्यांच्या सहकाऱ्यांना केली आणि त्यांनीही ती मान्य केली.’

आणखी वाचा-Ratan Tata : रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार, राज्य सरकारकडून एक दिवसाचा दुखवटा जाहीर

रतन टाटा परतताना मकाशीर यांना भेटले. त्या वेळी अदिश्रीही बरोबर होती. मकाशीर सांगतात, ‘आम्ही इंग्रजीत बोलायची जुळवाजुळव करत होतो, तेव्हा रतन टाटांनीच आमच्याशी मराठी-हिंदीत संवाद साधायला सुरुवात केली. आम्ही पुन्हा थक्क झालो. निघताना त्यांनी माझ्या मुलीला जे सांगितले, ते पक्के मनावर कोरले गेले. ते म्हणाले होते, ‘सेट युवर गोल अँड फोकस ऑन इट’. माझ्या मुलीसाठी तो कानमंत्रच बनून गेला…’

मोठ्या माणसाचा भारावणारा साधेपणा

मी सोसायटीचा चेअरमन आहे, असे रतन टाटांच्या सहकाऱ्याने त्यांना सांगितल्यावर ते आवर्जून माझ्याशी बोलायला थांबल्याचे मला आठवते. इतका मोठा माणूस माझ्यासारख्या सामान्य माणसाशीही ज्या अदबीने बोलत होता, ते पाहून मी भारावून गेलो. मुळात तेही अत्यंत साधेपणाने आले होते. साधासाच पेहराव, हातात एक कागदी पिशवी आणि त्यात पाण्याची बाटली व औषधाच्या गोळ्या. ‘मी इंडस्ट्रियलिस्ट आहे, बिझनेसमन नाही,’ हे त्यांचे वाक्य मनात कोरले गेले आहे…’ जनता सहकारी बँकेच्या सहकारनगर शाखेत व्यवस्थापक म्हणून काम करणारे अभिजित मकाशीर ही आठवण सांगताना भारून गेले होते.