-अभिषेक दळवी (उपव्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र)

मी लालबागमध्ये सर्वसामान्य कुटुंबात राहणारा. माझी आजी कुलाब्याला राहते. तिकडे बाजूलाच युनायटेड सर्व्हिसेस क्लब आहे. तिकडे टिटो आणि टँगो या दोन जर्मन शेफर्ड जातीच्या श्वानांसह साहेब (रतन टाटा) यायचे. तिथे आमच्या परिचयाचे सुरेंद्र लाड होते. त्यांनी एक दिवस मला साहेबांना भेटायला येण्यास सहज सांगितले. मला त्या वेळी खूप उत्सुकता होती. एवढ्या मोठ्या व्यक्तीची सहज भेट होणार म्हणून मी आनंदित होते. मी तिथे गेल्यानंतर माझी ओळख करून दिली. तिथे मी दोन्ही श्वानांसोबत काही काळ खेळलो. साहेबांनीही ते पाहिले. त्यांना यातून माझी आपुलकी दिसली.

kartik aaryan on his dating life
कार्तिकने रिलेशनशिपच्या चर्चांवर सोडलं मौन; म्हणाला, “मी तर…”
Todays Horoscope 9 November In Marathi
९ नोव्हेंबर पंचांग: कष्टाचे फळ, कुटुंबात गोडवा ते…
nala sopara railway station
मराठीचा आग्रह करणाऱ्या प्रवाशाला डांबले, तिकीट तपासनीसाची दमदाटी
MNS President Raj Thackeray clear statement regarding Shiv Sena party symbols print politics news
शिवसेना, धनुष्यबाण ही शिवसेनाप्रमुखांची मालमत्ता; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची स्पष्टोक्ती
leopard trapped Surgana Taluka Avalpada,
आदिवासी महिलेच्या धैर्यामुळे मुलांची सुटका अन बिबट्या बंदिस्त
Sunny Leone and Daniel Weber renewed their wedding vows
अभिनेत्री सनी लिओनीने डॅनियलशी पुन्हा केलं लग्न, तिन्ही मुलांची उपस्थिती, फोटो आले समोर
Nana Kate, Ajit Pawar, Nana Kate withdrew election,
चिंचवडमधून अजित दादांच्या शिलेदाराचे बंड शमले; नाना काटेंची निवडणुकीतून माघार
Jitendra Awad criticism of BJP regarding the murders print politics news
हत्या करणे भाजपच्या डाव्या हाताचा खेळ; जितेंद्र आव्हाड यांची टीका

त्यानंतर मी साहेबांना शनिवारी-रविवारी श्वानांसोबत घरी खेळायला येऊ का, अशी विचारणा केली. त्यांनीही अतिशय सहजपणे परवानगी दिली. तेव्हा २००७ पासून मी त्यांच्या घरी जाऊ लागलो. मी संध्याकाळच्या वेळी तिथे जायचो. साहेबही टिटो आणि टँगोला घेऊन खेळायला खाली यायचे. त्या वेळी मी त्या श्वानांसोबत खेळायचो. ते कामावरून आल्यावर सर्वप्रथम श्वानांकडे लक्ष द्यायचे. तासभर त्यांच्यासोबत वेळ घालवल्यानंतर ते कार्यालयीन काम पाहायचे.

आणखी वाचा-जेव्हा रतन टाटा पिंपरीतील कामगारांसोबत जेवण करतात…ताटही स्वतः उचलून ठेवतात…

अनेक वेळा नवीन मोटार घेतली, की ते मला दाखवायचे. तिच्यातील नवीन वैशिष्ट्ये आवर्जून दाखवायचे. त्यात हा बाहेरील माणूस आहे, असा कधीही भेद नव्हता. श्वानप्रेमामुळे त्यांचे आणि माझे ऋणानुबंध जुळले. त्यांचे श्वानप्रेम अतिशय वाखाणण्यासारखे होते. त्यांचा आणि माझा हा प्रवास २६/११ च्या हल्ल्यापर्यंत सुरू होता. नंतर सुरक्षेच्या कारणास्तव तिकडे जाण्यात अडचणी येऊ लागल्या. पुढे त्यांची प्रकृती खालावल्यानंतर भेटी आणखी कमी झाल्या. मात्र, मी आवर्जून माझा वाढदिवस असेल, त्या दिवशी साहेब मुंबईत असतील, तर घरी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेत असे. माझी त्यांची शेवटची भेट २२ मे २०१९ रोजी झाली. त्या दिवशी माझा वाढदिवस होता. त्यांच्या घरी जाऊन आशीर्वाद घेतले. माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातील मुलाला त्यांचा सहवास लाभला. त्यांच्यातील आत्मीयतेचा झरा त्यामुळे मला अनुभवता आला.

(शब्दांकन : संजय जाधव)