राष्ट्रवादीचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, या अधिवेशनानंतर ताबडतोब अगदी दुसऱ्यादिवशी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असं मला वाटतं. अशी पुणे येथे माध्यमांना माहिती दिली आहे. शिवाय, सरकारच्या कामकाजांना काही अडचण येणर नाही, उगाचच लोकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

याप्रसंगी भुजबळ म्हणाले की, कामकाजांना काही अडचणी येतील, अस मला वाटत नाही. उगाचच लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, या अधिवेशनानंतर ताबडतोब अगदी दुसऱ्यादिवशी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असं मला वाटतं. याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव अतिशय चांगला असल्याचे सागंत, २५ वर्षांपासून आम्ही ओळखतो, शिवसेनेच्या कामात आम्ही सोबतच होतो. त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव चांगलाच आहे, ते स्पष्टवक्ते आहेत. खरं बोलणारे आहेत. एखादी गोष्ट पटल्यानंतर तातडीने निर्णय घेतात. असे जर खुलेपणाने बोलणारे नेते असतील तर ते आपल्याला अधिक आनंद देतात, असे त्यांनी म्हटले.

पवार साहेबांना जर भाजपाबरोबर जायचं असतं तर ते आम्हाला सर्वांनाच घेऊन गेले असते. कारण ते पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांच्या मनात तसं काही असतं तर त्यांनी तसं सांगितलं असतं, मात्र तसं काही नव्हतं. या सर्व घडामोडी घडल्यापासून पवार यांनी शिवसेना आणि काँग्रेसबरोबर जायचं हे ठरवलेलं होतं. आमचा मित्र पक्ष काँग्रेसला सुरूवातीला विश्वासात घेऊन नंतर शिवसेनशी चर्चा केली. यानंतर किमान समान कार्यक्रमाची निश्चिती झाल्यावर एकत्र येण्याचं ठरलं. त्यामुळे यानंतर अजित पवार यांना शरद पवार यांनी काही सांगण्याचा संबंध येतच नाही, असे देखील भुजबळ यांनी यावेळी स्पष्ट केले.

भाजपातील ओबीसी नेत्यांना अन्याय सहन झाला नाही किंवा होत नसल्यामुळेच ते जनतेसमोर आलेले आहेत. महापोर्टलच्या कामास सध्या स्थिगिती दिलेली आहे, यावर पुर्नविचार होईल. यासंदर्भातील सर्व माहिती घेऊन निर्णय घेतला जाईल, अशी देखील त्यांनी यावेळी माहिती दिली.