scorecardresearch

पुणे: विवाहाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार; मोबाइलवर ध्वनिचित्रफीत, छायाचित्र काढून मुलीला धमकावले

विवाहाचे आमिष दाखवले. त्यानंतर मुलीला एका हाॅटेलमध्ये नेऊन तिच्यावर सांगळेने अत्याचार केले.

lured a girl marriage
प्रातिनिधिक छायाचित्र /लोकसत्ता

अल्पवयीन मुलीला विवाहाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या तरुणाला लोणीकंद पोलिसांनी अटक केली.या प्रकरणी हणमंत किसन सांगळे (वय २४, रा. गणेशनगर, वाघोली) याला अटक करण्यात आली. याबाबत एका महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ऑगस्ट २०२१ ते १६ जानेवारी २०२३ दरम्यान घडला. फिर्यादी महिलेच्या अल्पवयीन मुलीला आरोपी सांगळेने जाळ्यात ओढले. तिला विवाहाचे आमिष दाखवले. त्यानंतर मुलीला एका हाॅटेलमध्ये नेऊन तिच्यावर सांगळेने अत्याचार केले. सांगळेने मुलीची ध्वनिचित्रफीत तयार केली आणि मोबाइलवर छायाचित्र काढले. सांगळेने मुलीच्या मोबाइलवर ध्वनिचित्रफीत पाठविली.

हेही वाचा >>>‘कोयत्या गँग विरोधात मोक्का लावण्याची प्रक्रिया सुरू’; चंद्रकांत पाटील यांची माहिती

मुलगी घाबरली. तिने सांगळेशी असलेले संबंध तोडले. त्यानंतर सांगळेने मुलीला धमकावले. माझ्याशी संबंध न ठेवल्यास ध्वनिचित्रफीत प्रसारित करण्याची धमकी मुलीला दिली. घाबरलेल्या मुलीने आईला या घटनेची माहिती पोलिसांना दिली. मुलीच्या आईने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक भदे तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-01-2023 at 15:28 IST