पुणे : सदनिका खरेदी व्यवहारातील दस्तनोंदणीसाठी शुल्क भरल्यानंतर मोबदल्यापोटी तीन हजार रुपयांची लाच घेणाऱ्या वकिलाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. छत्रपती शिवाजी रस्त्यावरील मामलेदार कचेरीसमोर ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी ॲड.माधव वसंतराव नाशिककर (रा. पद्मावती) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तक्रारदाराने त्याच्या पत्नीच्या नावे सदनिका खरेदी केली.

हेही वाचा >>> पिंपरी : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पिंपरीतील २१ पोलिसांना ‘विशेष सेवा पदक’ जाहीर 

हवेली दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करण्यात आली होती. तक्ररादाराने दस्त नोंदणीसाठी शासकीय शुल्क दिले होते. दस्त नोंदणी झाल्यानंतर तक्रारदाराने वकिलांची फी ॲड. नाशिककर यांना दिली होती. त्यानंतर दस्त नोंदणीचा मोबदला द्यावा लागेल, दस्त नोंदणी अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतील, असे सांगून तक्रारदाराकडे तीन हजार हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. छत्रपती शिवाजी रस्त्यावर सापळा लावण्यात आला. तक्रारदाराकडून तीन हजार हजारांची लाच घेणाऱ्या ॲड. नाशिककर यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त अधीक्षक डाॅ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक वीरनाथ माने तपास करत आहेत.