पुणे: मुंबई-बंगळूरू बाह्यवळण महामार्गावरील वारजे भागात भरधाव ट्रकने नऊ ते दहा वाहनांना धडक दिली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. ही घटना सोमवार रात्री आठच्या सुमारास घडली. त्यानंतर सुमारे दीड ते दोन तास महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.
भरधाव ट्रक चांदणी चौक कडून वारजेकडे निघाला होता. मॅकडोनाल्डसमोर रस्त्यावर कोंडी झाल्यामुळे वाहतुकीचा वेग संथ झाला होता. त्यावेळी आरएमडी कॉलेजच्या उड्डाण पुलावरून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने मोटारीला धडक दिली. धडक एवढी जोरात होती की, मोटार रस्त्याच्या कडेला दुभाजकावर आदळली.
हेही वाचा >>>pimpri crime: कोयता गँग सक्रिय? शुल्लक कारणावरून कोयत्याने वार
दोन मार्गिका बंद झाल्यावर डुक्कर खिंड ते चांदणी चौकपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. वारजे वाहतुक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप खंडागळे कर्मचारी राकेश कांबळे आणि सी. पी. जाधव आणि कर्मचाऱ्यांनी अपघातग्रस्त वाहने क्रेनने बाजूला काढली. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.