पुणे : लोणी काळभोर परिसरातील रामदऱ्याजवळ आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीसाठी बांधण्यात आलेला स्टेज कोसळून एकजण मृत्युमुखी पडल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. दुर्घटनेत तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बाळासाहेब काशीनाथ कोळी (वय ४६, रा. निनाम पाडळी, जि. सातारा) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. दुर्घटनेत शुभम विजय लोखंडे (वय २४), मयूर प्रमोद लोखंडे (वय २५), विकास वाल्मिक ढमाळे (वय २४, रा. पिंपरी वळण, ता. राहुरी, जि. अहमदनगर) जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती लोणी काळभोर पोलिसांनी दिली.

हेही वाचा – पुण्याच्या मंचरमध्ये बिबट्याने केली घोडीची शिकार! ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

लोणी काळभोर परिसरातील रामदरा परिसरात रविवारी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले. शर्यतीसाठी ग्रामस्थांनी स्टेज बांधला होता. रविवारी सायंकाळी लोणी काळभोर परिसरात मुसळधार पाऊस सुरू झाला. जोरदार वारे वाहत असल्याने बाळासाहेब कोळी, शुभम लोखंडे, मयूर लोखंडे, विकास ढमाळे आडोशाला स्टेजजवळ थांबले. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे स्टेज कोसळला आणि आडोशाला थांबलेले कोळी, लोखंडे, ढमाळे यांच्या अंगावर कोसळला. या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली.

हेही वाचा – पुणे : राज्य शैक्षणिक आराखडा निर्मितीसाठी ३२ सदस्यांची ‘जम्बो’ सुकाणू समिती

स्टेज कोसळल्यानंतर परिसरात धावपळ उडाली. गंभीर जखमी झालेल्या बाळासाहेब कोळी यांच्यासह शुभम लोखंडे, मयूर लोखंडे, विकास ढमाळे यांना तातडीने हडपसर भागातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच बाळासाहेब कोळी यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accident in bullock cart race in loni kalbhor stage collapse one died three seriously injured pune print news rbk 25 ssb
First published on: 04-06-2023 at 22:06 IST