scorecardresearch

ट्रॅक्टरचा दुचाकीला धक्का लागल्याने आईच्या हातातून निसटलं बाळ, चिमुकल्याचा जागीच मृत्यू

काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

ट्रॅक्टरचा दुचाकीला धक्का लागल्याने आईच्या हातातून निसटलं बाळ, चिमुकल्याचा जागीच मृत्यू
अपघातात सहा महिन्याच बाळ आई च्या हातातून पडलं अन थेट ट्रॅक्टरखाली आलं…

पुणे : पुण्याच्या राजगुरूनगर येथे अवघ्या सहा महिन्याच्या बाळाचा दुचाकी आणि ट्रॅक्टरच्या अपघातात मृत्यू झाला आहे. काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. अपघात घडल्यानंतर उपस्थित नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे. ट्रॅक्टर चालक मात्र काही घडलेच नाही अशा रुबाबात तिथून निघून गेल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, आपल्या सहा महिन्याच्या आजारी बाळाला आई, वडील दुचाकीवरून रुग्णालयात घेऊन जात होते. पाठीमागून आलेल्या ट्रॅक्टरला पुढे जाण्यास त्यांनी जागा दिली, मात्र ट्रॅक्टरचा धक्का लागल्याने सहा महिन्याचं चिमुकल बाळ आईच्या हातातून थेट ट्रॅक्टरच्या चाकाखाली गेले. क्षणार्धात त्याचा आईच्या डोळ्यासमोरच मृत्यू झाला आहे. अपघातग्रस्त बाळाला उचलून त्या आईने काळजाला घट्ट धरले अन हंबरडा फोडला. घटनेनंतर ट्रॅक्टर चालक थांबला नाही तो तसाच पुढे निघून गेला.

हेही वाचा : मॉल, दुकानांमध्ये वाइन विक्रीबाबत लवकरच धोरण; शुल्कमंत्री शंभुराज देसाई यांची माहिती

घटनेनंतर उपस्थित नागरिकांनी बाळ पाहताच हळहळ व्यक्त केली आणि दुचाकी बाजूला घेऊन त्या बाळाच्या आई, वडिलांना धीर दिला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. हा अपघात राजगुरूनगर वाडा रोडवर घडला आहे. संबंधित ट्रॅक्टर चालकावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिक करत आहेत. 

मराठीतील सर्व पुणे न्यूज ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Accident six month old baby fell from the mothers hand fell directly under the tractor pune kjp

ताज्या बातम्या