पिंपरी-चिंचवड शहरातील मुख्य तसेच अंतर्गत भागातील खराब रस्त्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहेत. वेगवेगळ्या रस्ते अपघातांत तीन मुलांचा मृत्यू झाला आहे. मात्र, महापालिका; तसेच वाहतूक पोलिसांना त्याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येते.पिंपळे गुरवच्या काटे पूरम चौकात शनिवारी (२६ नोव्हेंबर) झालेल्या अपघातात निरंजन हिरवे (वय-१७) या मुलाचा अपघात झाला होता. तो दुचाकीवरून घराकडे येत असताना रस्त्यावर अपघात झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचा >>>पुणे: कार्यकाळ संपलेल्या सदस्यांना मुदतवाढ; विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचा निर्णय

three thousand families staying near waldhuni river boycotting lok sabha election, construction within river bed
कल्याणमध्ये वालधुनी नदी परिसरातील तीन हजार कुटुंबीयांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार
akola unseasonal rain marathi news
अकोल्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळीचा तडाखा; चार हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान; ५५ घरांची पडझड
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद
(11 goats died in attack by stray dogs in Jalgaon )
जळगावात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात ११ बकर्‍या मृत्युमुखी

चिंचवड शाहूनगरला २४ नोव्हेंबरला झालेल्या अपघातात अथर्व रवींद्र आळणे (वय-११) या शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. तो त्याच्या आईसोबत शाळेसाठी निघाला होता. जुन्या आरटीओजवळ त्यांच्या दुचाकीला कारची धडक बसली, तेव्हा अथर्वचा जागीच मृत्यू झाला. खराब रस्त्यामुळे हा अपघात झाल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा >>>पुणे: आम्ही फक्त प्रश्न सोडवायला; राज ठाकरे यांची खंत

कासारवाडीत २९ ऑक्टोबरला रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे व्यंकटेश शंकर डोकडे (वय २) या बालकाचा मृत्यू झाला होता. येथे रहदारीचा रस्ता महिनाभरासाठी खोदून ठेवला होता. धोकादायक झालेल्या या रस्त्याकडे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळेच व्यंकटेशचा जीव गेल्याची तक्रार डोकडे कुटुंबियांनी केली होती.शहरात दररोज छोटेमोठे अपघात होत आहे. वेगवेगळ्या कारणांसाठी रस्ते खोदून ठेवले जातात. ते वेळेत बुजवले जात नाहीत. त्यातून असे अपघात होतात. ही परिस्थिती माहिती असतानाही वाहतूक पोलीस व स्थापत्य विभागाचे अधिकारी आवश्यक कायर्वाही करत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.