पुणे : आंघोळ करतानाचे व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल करून, तो व्हिडिओ डिलीट करण्यासाठी पीडित महिलेकडे शरीर सुखाची आणि पैशांची मागणी करणार्‍या आरोपीला वानवडी पोलिसांनी नाशिक येथून अटक केली आहे.कृष्णा संपत शिंदे वय २० रा.चव्हाण मळा नाशिक असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही नाशिक येथे राहण्यास होती.तिचे लग्न झाल्यावर ती पुण्यात आली. नाशिक येथे पीडित महिला राहण्यास असताना आरोपी कृष्णा शिंदे याने पीडित महिला आंघोळ करीत असताना. तो व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. या व्हिडिओ बाबत पीडित महिलेस माहीती झाली. त्यानंतर आरोपीला पीडित महिलेने जाब विचारत व्हिडिओ डिलीट करण्यास सांगितला. त्यावर आरोपी कृष्णा शिंदे याने पीडित महिलेकडे शरीर सुखाची मागणी किंवा ३० हजार रुपये रोख रकमेची मागणी केली.

Bombay high court on Badlapur sexual assault
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण : महिला पोलीस अधिकाऱ्यावर फौजदारी कारवाई काय? उच्च न्यायालयाचा सवाल
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Accused sentenced to 10 years in hard labor for abusing minor girl in Dharashiv
अल्पवयीन मुलीवर दुष्कर्म; आरोपीस १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा, विशेष सत्र न्यायालयाचा निकाल
pune college admission fraud
पुणे: महाविद्यालयात प्रवेशाच्या आमिषाने फसवणूक, महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
Crime News
Crime News : TikTok वर व्हिडीओ पोस्ट करण्यावरून पोटच्या १५ वर्षीय मुलीचं ‘ऑनर किलिंग’; US मधून पाकिस्तानात परतल्यानंतर बापाने घातल्या गोळ्या
uday samant reaction marathi and non Marathi dispute over satyanarayan puja
मराठी भाषेबाबत जर कोणी अटकाव करीत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे : उदय सामंत
bhandup police arrested accused who forced women into prostitution by luring money
महिलांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणारा आरोपी अटकेत
Karnataka High Court's ruling clarifies that consent for sex does not equate to permission for assault.
“लैंगिक संबंध ठेवण्याची संमती म्हणजे महिलेवर…”, हवालदाराच्या पत्नीचे पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप

आणखी वाचा-‘मोक्का’ कारवाई केलेल्या गुंडाकडून हाॅटेलची तोडफोड, धानोरीतील हाॅटेल चालकाकडे खंडणीची मागणी

या सर्व घडलेल्या प्रकाराबाबत पीडित महिलेने आमच्याकडे तक्रार दिली.त्यानुसार पोलिस अंमलदार अमोल पिलाने, अतुल गायकवाड यांनी तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर आरोपी कृष्णा शिंदे हा नाशिकमध्ये असल्याचे दिसून आले.त्यानंतर आमच्या टीमने नाशिक गाठून आरोपीला अटक केली.वरीष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आदमाने, गुन्हे शाखेचे निरीक्षक गोविंद जाधव, उपनिरीक्षक धनाजी टोणे,दया शेगर, सुजाता फुलसुंदर यांच्या पथकाने कारवाई केली आहे.तर या घटनेचा अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Story img Loader