भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक दीपक उर्फ बाबा मिसाळ यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून खंडणी मागणी करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीस तेलंगणातून अटक केली. इम्रान समीर शेख,( रा. ७९, विकासनगर, घोरपडी गाव, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत भाजपचे माजी नगरसेवक दीपक उर्फ बाबा मिसाळ (रा. लष्कर) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- शरीरसौष्ठवासाठी वापरणाऱ्या इंजेक्शनची बेकायदा विक्री; पावणेदोन लाखांची इंजेक्शन जप्त

भाजपा आमदार माधुरी मिसाळ यांनी जनसंपर्कासाठी उपलब्ध करुन दिलेल्या मोबाइल क्रमांकावर शेख याने संपर्क साधून खंडणीची मागणी केली होती. शेख याने मिसाळ यांना जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांना खंडणीची मागणी केली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर बिबवेवाडी पोलिसांनी तपास सुरू केला.

हेही वाचा- टोळक्याकडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत एकाचा खून; पुण्यातील नर्‍हे भागातील घटना

तांत्रिक तपासात आरोपीचे नाव निष्पन्न झाले. त्यानंतर शेख तेलंगणात पसार झाल्यची माहिती मिळाल्यानंतर बिबवेवाडी पोलिसांच्या पथकाने त्याला तेथून ताब्यात घेतले, अशी माहिती परिमंडळ पाचच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण काळुखे, शाम लोहोमकर, सतीश मोरे, तानाजी सागर आदींनी ही कारवाई केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accused arrested from telangana who demanded extortion from former bjp corporator pune print news dpj
First published on: 01-10-2022 at 16:39 IST