खरेदीचा बहाण्याने व्यापाऱ्याचे अपहरण करून त्याला वसईच्या जंगलात सोडून देणाऱ्यांपैकी एकाला हडपसर पोलिसांनी राजस्थानमधील पाली येथून अटक केली. प्रेमसंबंधातून हे अपहरण करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. कैलासराम सोहनलाल जाट (वय ३५, रा. पाली, राजस्थान) असे त्याचे नाव आहे. त्याचे साथीदार तिकाराम खोत, भंवर जाखड, गाविंद (सर्व रा. जालोर, राजस्थान) यांचा शोध सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- पुणे: एकाच दिवशी ३१ हजार नवमतदारांची नोंदणी; ४४२ महाविद्यालयात खास शिबिरे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यापाऱ्याचे मांजरी येथे दुकान आहे. २३ नोव्हेबर रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास तिघे जण दुकानात आले. व्यापाऱ्याला मारहाण करून त्यांनी मोटारीतून त्याला पळवून नेले. त्यानंतर वसई विरार टोलनाक्याजवळील जंगलात पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास सोडून ते निघून गेले होते. हडपसर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तांत्रिक तपास केल्यावर त्यातील एक संशयित राजस्थानातील पाली येथे असल्याचे कळाले. तपास पथकाने पाली येथे जाऊन कैलासराम जाट याला पकडले. त्यातून अपहरणामागील कारण स्पष्ट झाले.

हेही वाचा- पिंपरी-चिंचवडमध्ये गोवरचे पाच रूग्ण; खबरदारी बाळगण्याचे महापालिका आयुक्तांचे आवाहन

व्यापाऱ्याचे एका तरुणीबरोबर प्रेमसंबंध आहेत. या तरुणीचे नातेवाईक राजस्थानमध्ये राहतात. त्यांना याची माहिती मिळाली. त्यातून आरोपींनी हा प्रकार केला. पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख, सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, पोलीस निरीक्षक दिगंबर शिंदे, विश्वास डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, उपनिरीक्षक अविनाश शिंदे, अंमलदार सुशील लोणकर, संदीप राठोड, प्रशांत टोणपे, अतुल पंधरकर, भगवान हंबर्डे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accused of kidnapping businessman from pune arrested in rajasthan pune print news dpj
First published on: 01-12-2022 at 22:00 IST