पुणे : वारजे भागात दहशत माजविणाऱ्या गुंडावर कारवाई ; झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये कारागृहात रवानगी

अनपूर आणि साथीदारांच्या दहशतीमुळे नागरिक पोलिसांकडे तक्रार करत नव्हते.

पुणे : वारजे भागात दहशत माजविणाऱ्या गुंडावर कारवाई ; झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये कारागृहात रवानगी
( संग्रहित छायचित्र )

वारजे भागात दहशत माजविणाऱ्या गुंडांच्या विरोधात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई केली. गुंडाला एक वर्षासाठी कोल्हापूरमधील कारागृहात स्थानबद्ध करण्यात येणार आहे.

व्यंकटेश उर्फ विकी शिवशंकर अनपूर (वय ३१, रा. सहयोगनगर, वारजे) असे कारावई केलेल्या गुंडाचे नाव आहे. अनपूर याच्या विरोधात गंभीर स्वरुपाचे तीन गुन्हे दाखल आहेत. अनपूर आणि साथीदारांच्या दहशतीमुळे नागरिक पोलिसांकडे तक्रार करत नव्हते. अनपुर याच्या विरोधात झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्याचा प्रस्ताव वारजे पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके, गुन्हे प्रतिबंधक विभागाच्या (पीसीबी) पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांनी तयार केला होता.

या प्रस्तावास पोलीस आयुक्त गुप्ता यांनी मंजुरी दिली. त्यानुसार अनपुरला वर्षभरासाठी कोल्हापुरातील कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश देण्यात आले आहे. गेल्या दीड वर्षात शहरातील ७५ गुंडांच्या विरोधात पोलीस आयुक्तांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई केली आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Action against goons terrorizing warje area jail under prevention act pune print news amy

Next Story
विद्यापीठ अधिकार मंडळ निवडणुकीसाठी आतापर्यंत ५१ हजार जणांची नोंदणी ; विविध घटकांच्या नोंदणीसाठी मुदतवाढ
फोटो गॅलरी