scorecardresearch

बारामतीतील चांदगुडेवाडीत वाळू माफियांवर कारवाई, कऱ्हा नदीपात्रात वाळू उपसा

या कारवाईत पोलिसांनी सहा जणांना अटक केली. त्यांच्याकडून वाळू, जेसीबी यंत्र, ट्रॅक्टर ट्राॅली असा ४७ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

sand mafia Chandgudewadi Baramati
बारामतीतील चांदगुडेवाडीत वाळू माफियांवर कारवाई (प्रातिनिधिक छायाचित्र)

पुणे : बारामतीतील चांदगुडेवाडी परिसरात कऱ्हा नदीपात्रातून बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांच्या विरोधात ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी सहा जणांना अटक केली. त्यांच्याकडून वाळू, जेसीबी यंत्र, ट्रॅक्टर ट्राॅली असा ४७ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

मनोहर शामराव चांदगुडे (वय ४६) विकास बाबासाहेब चांदगुडे (दोघे रा. धरणवस्ती, चांदगुडेवाडी, ता. बारामती, जि. पुणे), स्वप्नील ज्ञानेश्वर भोंडवे (वय २७, रा. आंबी खुर्द, ता. बारामती, जि. पुणे), विठ्ठल तानाजी जाधव, (वय २५, रा. आंबी खुर्द, ता. बारामती, जि. पुणे), अमोल शंकर सणस (वय ४६, रा. उरळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे), महादेव बाळू ढोले (वय ३८, रा. मोरगाव, चौथाळवस्ती, ता. बारामती. जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. बारामती परिसरातील चांदगुडेवाडीत कऱ्हा नदीपात्रातून बेकायदा वाळू उपसा करण्यात येत असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने कारवाई केली.

हेही वाचा – पुणे : अबोला धरल्याने प्रियकराचा प्रेयसीच्या घरासमोर गोंधळ, तरुणाला पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस

हेही वाचा – पुणे : नाना पेठेत तरुणाचा खून करणाऱ्या गुंड टोळीवर ‘मोक्का’

मनोहर चांदगुडे, विकास चांदगुडे साथीदारांच्या मदतीने वाळू उपसा करत असल्याचे आढळून आले. चौकशीत तुषार दत्तात्रय चांदगुडे आणि त्याच्या दोन भागीदारांनी वाळू दिल्याचे दोघांनी सांगितले. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन जेसीबी यंत्र, दोन ट्रॅक्टर ट्राॅली जप्त केल्या. पोलिसांना पाहताच अंधारात एक जण जेसीबी यंत्रासह पसार झाला. पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, राहुल कावडे, कारंडे, सचिन घाडगे, विजय कांचन, कोकरे, एकशिंगे, अहिवळे आदींनी ही कारवाई केली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 17:21 IST