कसबा पेठेत दहशत माजविणाऱ्या गुंडाच्या विरोधात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्याचे आदेश दिले. गुंडाला वर्षभरासाठी कोल्हापुरातील कारागृहात स्थानबद्ध करण्यात येणार आहे. संकेत उर्फ भूषण आनंद तारु (वय २२, रा. भोईराज भवनजवळ, १११७ कसबा पेठ) असे कारवाई केलेल्या गुंडाचे नाव आहे.

हेही वाचा- पुणे: एसटी प्रवासी महिलेचे दागिने चोरीस

Sexual abuse of young woman by pretending treatment case filed against self-proclaimed doctor in Nalasopara
उपचाराच्या नावाखाली तरुणीवर लैंगिक अत्याचार, नालासोपार्‍यात स्वयंघोषित वैद्याविरोधात गुन्हा दाखल
nashik 60 lakh machinery stolen marathi news
यंत्रसामग्री चोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी पाच वर्षे फरफट, दिंडोरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तक्रारदाराचा संशय
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?
demonetisation decision taken by modi government in 2016 was illegal and wrong says justice bv nagarathna
‘निश्चलनीकरणाचे परिणाम उद्दिष्टांच्या विरोधात’, सामान्य माणसाला झालेल्या त्रासाने अस्वस्थ- न्या. नागरत्न

संकेत विरोधात खुनाचा प्रयत्न, दहशत माजविणे, पिस्तुल बाळगणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या विराेेधात कारवाई करण्याचा प्रस्ताव फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद आणि गुन्हे प्रतिबंधक शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांनी तयार केला होता. या प्रस्तावास पोलीस आयुक्त गुप्ता यांनी मंजुरी देऊन त्याला वर्षभरासाठी कोल्हापुरातील कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार आतापर्यंत शहरातील ८९ गुंडांच्या विरोधात झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.