scorecardresearch

Premium

पुणे महापालिकेकडून वैशाली हॉटेलवर हातोडा

फर्ग्युसन रस्त्यावरील हॉटेल वैशाली आणि क्वीन्स शाॅप स्टोरी या हॉटेलवर महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाकडून कारवाई करण्यात आली.

vaishali hotel
पुणे महापालिकेकडून वैशाली हाॅटेलवर हातोडा

पुणे : फर्ग्युसन रस्त्यावरील हॉटेल वैशाली आणि क्वीन्स शाॅप स्टोरी या हॉटेलवर महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाकडून कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये एकूण ३ हजार ५०० चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले.शिवाजीनगर भागातील फर्ग्युसन रस्त्यावरील हॉटेल वैशाली आणि क्वीन्स शाॅप स्टोरी या हॉटेलकडून अनधिकृत शेड घालण्यात आले होते. त्यानुसार बांधकाम विभागाकडून ही कारवाई करण्यात आली. बांबू आणि पत्र्यांच्या सहाय्याने बांधलेल्या शेडचा समावेश आहे. वैशाली हॉटेलमधील टेरेस आणि सामासिक अंतरातील सर्व विनापरवाना शेड कारवाई करून हटविण्यात आल्या. यावेळी पक्के उभारलेले शेड गॅस कटरच्या सहाय्याने कापण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून देण्यात आली.

पोलीस बंदोबस्तामध्ये कारवाई

पोलीस बंदोबस्तामध्ये कार्यकारी अभियंता बिपीन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उप अभियंता सुनील कदम, शाखा अभियंता राहुल रसाळे, कनिष्ठ अभियंता समीर गढई यांनी ही कारवाई केली. घरपाडी विभागाकडील दहा बिगारी, एक पोलीस गट या कारवाईत सहभागी झाला होता. हॉटेलकडून पुन्हा शेड उभारण्यात आली तर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती सुनील कदम यांनी दिली.

Health workers Mumbai Mnc
मुंबई महापालिकेच्या आरोग्य सेविकांचे बुधवारी ठिय्या आंदोलन
high court , Thane district collector, high court, Ghodbunder road
घोडबंदर रस्ता सुस्थितीत! ठाणे जिल्हाधिकाऱ्यांचा उच्च न्यायालयात दावा
attack, Fatal attack on director of Mumbai Waste Management
पनवेल: मुंबई वेस्ट मॅनेजमेंटच्या संचालकांवर मॉर्निंग वॉक करताना जीवघेणा हल्ला
pune metro
पुण्यात मेट्रो मार्गांचा तिढा! पीएमआरडीए, महामेट्रोची समान मार्गांकडे धाव

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Action on vaishali hotel from pune municipal corporation pune print news apk 13 ysh

First published on: 20-09-2023 at 19:02 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×