पुणे : राज्यासह देशभरातील नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीच्या विरोधात पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले. गेल्या दीड वर्षात पुणे पोलिसांनी शहरातील १०० टोळ्यांच्या विरोधात माेक्का कारवाई केली आहे. मोक्का कारवाईमुळे शहरातील संघटित गुन्हेगारीला चाप बसला आहे.

लोन ॲपच्या माध्यमातून फसवणूक करण्याच्या घटना वाढीस लागल्या होत्या. गेल्या तीन वर्षांत पुणे शहर आणि जिल्ह्यातील पाच हजार जणांची लोन ॲपच्या माध्यमातून फसवणूक करण्यात आली हाेती. लोन ॲपच्या तगाद्यामुळे एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली होती. लोन ॲपच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या टोळ्यांच्या विरोधात कडक कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त गुप्ता यांनी सायबर पोलिसांना दिले होते. त्यानंतर सायबर पोलिसांनी बंगळुरू, सोलापूर, पुणे परिसरात कारवाई करुन १८ जणांना अटक केली. बंगळुरूतील टोळीकडून चालविण्यात येणाऱ्या काॅल सेंटरवर छापा टाकण्यात आला होता.

trees in Mumbai being killed by poison
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग; पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!
fraud with 628 investors
गुंतवणुकीच्या नावाखाली ६२८ गुंतवणूकदारांची ५७९ कोटींची फसवणूक, आरोपी सनदी लेखापालाला ८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
Ministers cars
राज्य सरकारवर आहे लाखो कोटींचं कर्ज, पण मंत्र्यांचा नवीन गाड्यांचा मोह काही सुटेना

हेही वाचा : पुणे महापालिकेकडून आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा ; १४ शिक्षकांची नावे जाहीर

लोन ॲपच्या माध्यमातून देशभरातील नागरिकांची फसवणूक करण्यात आल्याचे गुन्हे दाखल झाले होते. अशा पद्धतीने फसवणूक करणाऱ्या चोरट्यांच्या त्रासामुळे नागरिक त्रस्त झाले होते. या टोळीच्या विरोधात मोक्का कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त गुप्ता यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, डाॅ. जालिंदर सुपेकर, सायबर गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटक्के, उपायुक्त श्रीनिवास घाडगे आदी या वेळी उपस्थित होते.

लोन ॲप प्रकरणात मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव सायबर गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीनल सुपे पाटील यांनी सादर केला होता. त्यानुसार धीरज भारत पुणेकर (वय ३६, रा. कुमठा नाका, सोलापूर), स्वप्नील हनुमंत नागटिळक (वय २९, रा. पप्पाराम नगर, विजापूर रस्ता, सोलापूर), श्रीकृष्ण भीमण्णा गायकवाड (वय २६, रा. भेकराईनगर, फुरसुंगी, हडपसर ), प्रमोद जेम्स रणसिंग (वय ४३, रा. मुमताजनगर, कुमठा नाका, सोलापूर), सॅम्युअल संपत कुमार (वय ४०), सय्यद अकिब पाशा (वय २३), मुबारक अफरोज बेग (वय २२), मुजीब बरांद कंदियल इब्राहिम (वय ४२), मोहम्मद मनियम पित्ता मोहिदू (वय ३२, सर्व रा. बंगळुरू, कर्नाटक) यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली.

हेही वाचा : शिक्षण आणि क्रीडा विभाग एकाच मंत्र्याकडे असण्याची आवश्यकता ; दीपक केसरकर

६७० गुंडाना मोक्का

गेल्या दीड वर्षात शहरातील १०० गुंड टोळ्यांमधील ६७० सराईतांच्या विरोधात मोक्का कारवाई करण्यात आली आहे. खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, दरोडा घालणे, दारूबंदी, अमली पदार्थ विक्री, लोन ॲप फसवणूक अशा गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या टोळ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. बंडू आंदेकर, निलेश घायवळ, सचिन पोटे, बापू नायर, सूरज ठोंबरे, महादेव अदलिगे, अक्रम पठाण या प्रमुख टोळ्यांमधील सराईत कारागृहात आहेत.

मोक्का कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारांना जरब बसली आहे. लोन ॲपच्या माध्यमातून सामन्यांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढीस लागले होते. संबंधित टोळीविरूद्ध मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. -अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे