scorecardresearch

पुणे: सिंहगड पथारीवाल्यांकडून खंडणी उकळणाऱ्या गुंडावर कारवाई; वर्षभरासाठी नागपूर कारागृहात स्थानबद्ध

सिंहगड रस्ता भागात पथारी तसेच किरकोळ विक्रेत्यांना धमकावून त्यांच्याकडून खंडणी उकळणाऱ्या सराईत गुन्हेगाराविरुद्ध पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्याचे आदेश दिले.

पुणे: सिंहगड पथारीवाल्यांकडून खंडणी उकळणाऱ्या गुंडावर कारवाई; वर्षभरासाठी नागपूर कारागृहात स्थानबद्ध
( प्रतिनिधिक छायाचित्र )

सिंहगड रस्ता भागात पथारी तसेच किरकोळ विक्रेत्यांना धमकावून त्यांच्याकडून खंडणी उकळणाऱ्या सराईत गुन्हेगाराविरुद्ध पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्याचे आदेश दिले. गुंडाची रवानगी नागपूर कारागृहात करण्यात आली आहे.

हेही वाचा >>>पुणे :कोथरुड, दत्तवाडी भागात अमली पदार्थांची विक्री; साडेचार लाखांचे अमली पदार्थजप्त, तिघे अटकेत

शिवराज शिंदे सिंहगड रस्ता परिसरात हातगाडीवर व्यवसाय करणारे विक्रेते तसेच पथारीवाल्यांकडून पैसे उकळत होता. शस्त्राचा धाक दाखवून त्यांना धमकावत होता. त्याला विरोध केल्यास तो मारहाण करायचा. त्याच्या विरोधात झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्याचा प्रस्ताव सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयंत राजूरकर यांनी तयार केला होता.अतिरिक्त आयुक्त राजेंद्र डहाळे, उपायुक्त सुहेल शर्मा, सहायक आयुक्त सुनील पवार यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. या प्रस्तावाची पडताळणी केल्यानंतर पोलीस आयुक्तांनी शिंदे याच्या विरोधात कारवाईचे आदेश दिले. त्याला वर्षभरासाठी नागपूर कारागृहात स्थानबद्ध करण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 15:29 IST

संबंधित बातम्या