अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने आंबेगाव बु. पुणे येथील महेंद्रसिंग मनोहरसिंग यांच्या विकी कुमार बिल्डींग मधील गोदाम जवळील पेढीवर धाड टाकून २२ हजार रुपये किंमतीचे ८८ किलो भेसळयुक्त तुप व ११ हजार ९६ रुपये किमतीचे ७३ किलो वनस्पती तूप , असा एकूण रुपये ३३ हजार ९६ चा साठा जप्त करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भेसळयुक्त पदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी राज्य आरोग्य प्रयोगशाळा पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. या प्रकरणी विक्रेत्याविरुद्ध तपासणीमध्ये आढळून आलेल्या त्रुटीच्या अनुषंगाने तडजोड अर्ज दाखल करुन रुपये १० हजार तडजोड शुल्क वसूल करण्यात आले आहे. विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा व मानदा कायदा २००६ अंतर्गत तरतुदीनुसार पुढील कारवाई घेण्यात येईल.

सह आयुक्त (अन्न) संजय नारगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त (अन्न) रमाकांत कुलकर्णी व अन्न सुरक्षा अधिकारी क्रांती बारवकर यांनी ही कारवाई केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action taken by food and drug administration against adulterated ghee manufacturers pune print news amy
First published on: 11-08-2022 at 18:58 IST