उद्योजक गणेश आणि नानासाहेब गायकवाड या पिता पुत्रांच्या टोळीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ‘मोक्का’अंतर्गत कारवाई केली आहे. त्यांच्यावर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात एकूण १४ गंभीर गुन्हे दाखल आहेत. या पिता-पुत्रांच्या टोळीत एकूण सहा सदस्य आहेत, असे पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. 

गणेश गायकवाड हा टोळीचा प्रमुख असून त्याच्यासह संदीप गोविंद गायकवाड, सचिन गोविंद गायकवाड, राजू दादा अंकुश, नानासाहेब शंकर गायकवाड आणि चंद्रकांत बाबासाहेब नाणेकर यांचा टोळीत सहभाग आहे. या सर्वांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ नुसार कारवाई करण्यात आली आहे. 

Kolhapur Police arrest gang selling fake notes
बनावट नोटांची छपाई, विक्री करणारी टोळी कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात; म्होरक्याचे नेत्यांशी लागेबांधे असल्याची चर्चा
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा
nashik crime news, nashik frau marathi news
नाशिकमध्ये कर्जदारांची मालमत्ता ताब्यात घेत फसवणूक, दोन सावकारांविरोधात गुन्हा; छाप्यात करारनामे, कोरे मुद्रांक, धनादेश जप्त
baba kalyani s niece nephew move court over property dispute
भारत फोर्जचे अध्यक्ष बाबा कल्याणी यांच्या कुटुंबीयांत संपत्तीचा वाद; कल्याणी यांच्या भाच्यांकडून दिवाणी न्यायालयात दावा

गणेश उर्फ केदार आणि नानासाहेब शंकर गायकवाड या दोघांसह एकूण सहा जणांवर पिंपरी-चिंचवड पोलिसात १४ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यात, खुनाचा प्रयत्न, अपहरण करून मारहाण, बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक, खंडणीसाठी मारहाण, अनैसर्गिक शारिरीक संबंध ठेवून खुनाचा प्रयत्न, दरोडा घालणे अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल आहेत.