scorecardresearch

पुणे : कोथरुडमधील गुंडाच्या विरोधात झोपडपट्टी दादा कायद्यान्वये कारवाई ; गुंड वर्षभरासाठी कारागृहात

कोथरुड भागात दहशत माजविणाऱ्या गुंडाच्या विरोधात झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्यात आली.

पुणे : कोथरुडमधील गुंडाच्या विरोधात झोपडपट्टी दादा कायद्यान्वये कारवाई ; गुंड वर्षभरासाठी कारागृहात
कोथरुडमधील गुंडाच्या विरोधात झोपडपट्टी दादा कायद्यान्वये कारवाई

कोथरुड भागात दहशत माजविणाऱ्या गुंडाच्या विरोधात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार गुंडाची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> पिंपरी : भाजपकडून राष्ट्रवादीला ‘लक्ष्य’ करण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू – जयंत पाटील

ऋषिकेश राजेंद्र ठाकूर ( वय २३, रा. माताळवाडी, भूगाव ) असे कारवाई केलेल्या गुंडाचे नाव आहे. ठाकूर आणि साथीदारांनी कोथरुडमधील सुतारदरा परिसरात गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहे. ठाकूरने परिसरात दहशत माजविली होती. त्याच्या विरोधात झाेपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्याचा प्रस्ताव कोथरुड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप आणि गुन्हे प्रतिबंधक शाखेच्या पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांनी तयार केला. पोलीस आयुक्तांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यानंतर ठाकुर याच्या विरोधात कारवाई करण्यात आली. ठाकूर याला एक वर्षासाठी मुंबईतील कारागृहात ठेवण्यात येणार आहे. गेल्या वर्षभरात शहरातील ७८ गुंडांच्या विरोधात झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या