पुणे : सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाबाबत प्रसिद्ध झालेल्या ‘लोकसत्ता’च्या बातमीवर रविवारी संगीत रसिक आणि कलाकार वर्तुळातून अनेक जण व्यक्त झाले. ‘वैविध्याला विरोध नाही, पण आशयाकडे दुर्लक्ष होऊ नये,’ अशी भावना या सगळ्या प्रतिक्रियांतून व्यक्त झाली आहे.

रागसंगीताच्या अर्थगर्भ परंपरेचे तिच्या मूळ स्वरूपात व्यक्त होणे नितांत गरजेचे असल्याची कळकळही रसिकांनी बोलून दाखवली. ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे सवंगीकरण होतेय का?’ असे वृत्त ‘लोकसत्ता’ने रविवारी प्रसिद्ध केले. ‘गेल्या काही काळात झालेले बदल श्रोतेशरण, प्रेक्षकशरण असे आहेत. देदीप्यमान परंपरा असलेल्या महोत्सवाच्या बाबतीत असे होऊ नये,’ असे कलाकार व रसिकांचे म्हणणे आहे. ‘हे कधी तरी बोलले जायला हवे होते. ‘लोकसत्ता’ने त्याला वाचा फोडली, हे चांगले झाले. रागाची मांडणी म्हणजे केवळ द्रुतलयीतील गायन किंवा ताना नाहीत. अलीकडे याचे भान विसरत चालले आहे. अशाने, नव्याने रागसंगीत ऐकणाऱ्या श्रोत्याला रागसंगीताचे मर्म समजणार कसे,’ असा सवाल एका गायक कलाकाराने उपस्थित केला.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा >>> महायुतीत समन्वयाचा अभाव नाही; ‘मुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय मोदी, शहा घेतील’, एकनाथ शिंदे यांचे स्पष्टीकरण

‘अलीकडे काही कलाकार सातत्याने या मंचावर सादरीकरण करताना दिसतात. ‘दिवाळी पहाट’मध्येही तेच, ‘सवाई’लाही तेच आणि त्यानंतरच्या महिन्यातील काही महोत्सवांतही तेच कलाकार असतात. या कलाकारांना हमखास कुठे टाळ्या मिळतात, हे माहीत झाले आहे. एक प्रकारे गायनाचेही असे गणित किंवा समीकरण तयार करून ठेवल्यासारखे झाले आहे. अशा पठडीबाज पद्धतीने रागसंगीताचे भले होणार नाही,’ अशी प्रतिक्रिया एका वादक कलाकाराने व्यक्त केली.

सांस्कृतिक राजधानी ते इव्हेंट सिटी अशी सध्या पुण्याची वाटचाल सुरू आहे. साहित्यासह कलेचे कोणतेही क्षेत्र त्यास अपवाद नाही. अभिरुची घडविण्यापेक्षा रसिकांच्या अभिरुचीवर स्वार होण्याच्या मानसिकतेतून हा बदल घडताना दिसतो. त्यातून मूळ हेतू हरवू नये, हीच अपेक्षा.

– प्रा. मिलिंद जोशी – लेखक आणि कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद

कोट २ मी गेली अनेक वर्षे ‘सवाई’च्या मंचावर अभिजात आणि निखळ शास्त्रीय गाणे ऐकले आहे. अनेक सुनकार किंवा कानसेन तयार करण्याचे मोठे काम या महोत्सवाने केले आहे. ती परंपरा पुढे चालू राहिली आहे, असे सध्याचे चित्र नाही. वैविध्याला अजिबात विरोध नाही, पण मजकूर किंवा कंटेंटकडे दुर्लक्ष होऊ नये, अशी मनापासून इच्छा आणि मागणी आहे. – भूषण देशपांडे, उद्योजक आणि संगीत रसिक

कोट ३ थोरामोठ्यांची गायन परंपरा आज चमत्कृती, बेढब फ्युजन आणि आकारहीन प्रयोगांत अडकून पडणार असेल, तर ती धोक्याची घंटा आहे. अर्थात, त्याला सन्माननीय अपवाद आहेत, पण मोजकेच. आणि, त्यासाठी इतर मंच उपलब्ध आहेत. रागसंगीताच्या अर्थगर्भ परंपरेचे तिच्या मूळ स्वरूपात व्यक्त होणे नितांत गरजेचे आहे. अन्यथा, संयमी आणि रसिक कान कसे तयार होणार? – सौरभ सद्योजात, संगीत रसिक

Story img Loader