अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांना दिलासा

पुणे:  राज्यातील वैयक्तिक मान्यताप्राप्त अंशत: अनुदानित शिक्षकांचे आता समान टप्प्यावरील रिक्त पदावर समायोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबाबतची कार्यपद्धती शालेय शिक्षण विभागाकडून निश्चित करण्यात आली असून, हा निर्णय केवळ २०२२-२३मध्ये संचमान्यतेने अतिरिक्त ठरलेल्या वैयक्तिक मान्यताप्राप्त अंशत: अनुदानित शिक्षकांना लागू असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

The nine judge bench of the Supreme Court
सर्वोच्च न्यायालयाचे नऊ न्यायाधीशांचे खंडपीठ कोणत्या प्रकरणांवर सुनावणी करणार?
MPSC Mantra Increasing Opportunities in Public Service Commission Competitive Exams
MPSC मंत्र: लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा- वाढत्या संधी
post of Health Director City
‘आरोग्य संचालक शहर’ हे पद तीन वर्षांनंतरही कागदावरच, शहरी आरोग्याविषयी सरकार उदासीन…
schools Maharashtra principals
राज्यातील २५ हजारांहून अधिक शाळा मुख्याध्यापकांविना? संचमान्यतेच्या सुधारित निकषांचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी

 राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अंशत: अनुदानित शाळामध्ये विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे वैयक्तिक मान्यता प्राप्त शिक्षकांचे पद कमी झाल्यास त्यांची सेवा समाप्त करण्यात येते. अशा सेवा समाप्त होणाऱ्या शिक्षकांचे सद्यस्थिती असलेल्या नियमानुसार समायोजन करण्यात येत नाही. त्यामुळे राज्यातील वैयक्तिक मान्यता प्राप्त अंशतः अनुदानित शिक्षकांचे समायोजन करण्याची मागणी लोकप्रतिनिधी, शिक्षक संघटना यांच्याकडून वारंवार करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर वैयक्तिक मान्यता प्राप्त अंशत: अनुदानित शिक्षकांना पुन्हा सेवेची संधी देण्यासाटी समान टप्प्यावरील अंशतः अनुदानित रिक्त पदावर समायोजन करण्याबाबतचा शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाने प्रसिद्ध केला.

हेही वाचा >>> सर्वधर्मीय शिवप्रेमी पुणेकर समितीच्या वतीने उद्या पुणे बंद; काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा

सन २०२२-२३ च्या संचमान्यतेनुसार पद कमी झाल्याने सेवा समाप्त होणाऱ्या वैयक्तिक मान्यता प्राप्त अंशत: अनुदानित शिक्षकांच्या समायोजनासाठी शिक्षण आयुक्तांच्या स्तरावर राज्यातील रिक्त असलेल्या अंशत: अनुदानित पदांचा आढावा घ्यावा. त्यानंतर राज्यात अंशतः अनुदानित पदे रिक्त राहात असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित पदांची यादी तयार करून त्या रिक्त पदांवर पद कमी झाल्याने सेवा समाप्त होणाऱ्या शिक्षकांचे समायोजन सेवा ज्येष्ठतेनुसार आणि बिंदूनामावली, विषय आदी सर्वसाधारण नियमांचे पालन करून करावे. वैयक्तिक मान्यता प्राप्त अशंत: अनुदानित कर्मचाऱ्यांचे प्रथम संस्थेतर्गत समान अनुदान टप्यावरील रिक्त पद उपलब्ध असल्यास समायोजन करण्यास प्राधान्य द्यावे. पद उपलब्ध नसल्यास इतर संस्थेच्या अनुदानाच्या समान टप्प्यावरील अंशत: अनुदानित पदावर समायोजन करावे. अशा प्रकारे समान टप्प्यावर पद उपलब्ध नसल्यास समायोजन करता येणार नाही आणि कुठल्याही परिस्थितीत अनुदानाचा टप्पा बदलून समायोजन करता येणार नाही, असे नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा >>>पुणे: पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे मूक आंदोलन

वेतन, भत्ते लागू नाहीत

वैयक्तिक मान्यता प्राप्त अंशत: अनुदानित शिक्षकांना सेवासमाप्त झाल्यापासून ते समायोजन होईपर्यतच्या कालावधीतील म्हणजेच सेवा न केलेल्या कालावधीतील वेतन आणि भत्ते यांची कोणतीही थकबाकी लागू होणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले.