पुणे : पुण्यात स्वतंत्र कर्करुग्णालय व्हावे, अशी मागणी खूप वर्षांपासून आहे. ससून रुग्णालयाशेजारील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) भूखंडावर कर्करुग्णालय उभारण्याची चर्चा अनेक वर्षे सुरू होती. परंतु, एमएसआरडीसीने हा भूखंड हा खासगी विकसकाला दिल्याने त्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. आता औंध उरो रुग्णालयातील जागेवर कर्करुग्णालय उभारण्यासाठी ससून रुग्णालय प्रशासनाने पुढाकार घेतला आहे.

बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय तथा ससून सर्वोपचार रुग्णालयाचा ४०० ते ५०० रुग्णशय्येचे कर्करुग्णालय आणि संशोधन केंद्र उभारण्याचा प्रस्ताव आहे. या केंद्रात कर्करोगावरील प्रगत उपचार होतील आणि त्याला संलग्न पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालयही असेल. कर्करुग्णालयाच्या उभारणीसाठी ६० टक्के निधी केंद्र सरकार देईल आणि ४० टक्के निधी राज्य सरकारचा वैद्यकीय शिक्षण विभाग देईल, असा प्रस्ताव आहे. कर्करुग्णालयात या माध्यमातून पुरेसा निधी मिळवून आधुनिक दर्जाची आरोग्य सुविधा उभारण्याचे नियोजन आहे. सध्या कर्करुग्णांना उपचारासाठी मुंबईला जावे लागते. भविष्यात नवीन सुविधा उभी राहिल्यास पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णांवर येथे उपचार होऊ शकतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Two hundred patients of hair loss problem ICMR team in Shegaon
केसगळतीचे रुग्ण दोनशेच्या घरात; ‘आयसिएमआर’चे पथक शेगावात…
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Proposal to set up a new super specialty hospital in Pune news
पुण्याच्या आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी होणार! लवकरच नवीन सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभे राहणार
unregistered doctors , Maharashtra Medical Council,
नोंदणीकृत नसलेल्या डॉक्टरांवर नववर्षात कारवाई, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचा निर्णय
Aaple Sarkar, devendra fadnavis, mumbai,
‘आपले सरकार’द्वारे सेवांमध्ये वाढ करा : मुख्यमंत्री
Eknath shinde Shiv Sena focus pune municipal elections
पुणे : शिवसेनेचे ४० ते ५० जागांवर लक्ष, महापालिका निवडणुकीसाठी तयारी सुरू
Health Department Launches Campaign to Inspect Private Hospitals
आरोग्य विभागाचे खासगी रुग्णालयांवर ‘लक्ष’! राज्यभरात नियमभंग शोधून कारवाईची मोहीम
AYUSH district hospitals , AYUSH hospitals ,
राज्यात स्वतंत्र १४ आयुष जिल्हा रुग्णालये!

हेही वाचा…विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसचालकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, दुर्घटनेप्रकरणी कोंढवा पोलिसांकडून गुन्हा दाखल

वैद्यकीय शिक्षण विभागाने कर्करुग्णालयाच्या उभारणीचा आराखडा तयार करण्यासाठी तज्ज्ञांची पाच सदस्यीय समिती स्थापन केली होती. या समितीने कर्करुग्णालय आणि पदव्युत्तर महाविद्यालयाचा आराखडा तयार केला आहे. हा आराखडा अंतिम टप्प्यात असून, तो जिल्हाधिकाऱ्यांना पुढील आठवड्यात सादर करण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकल्पासाठी जमीन देण्याचे आश्वासन दिलेले आहे. औंध उरो रुग्णालयाची एकूण ८५ एकर जागा आहे. त्यातील १० एकर जागेवर कर्करुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

हेही वाचा…सायबर चोरट्यांकडून तरुणाची २७ लाखांची फसवणूक, ऑनलाइन टास्कच्या आमिषाने फसवणुकीचे सत्र कायम

कर्करुग्णालय असे असेल…

प्रगत कर्करोग उपचार केंद्र

संलग्न पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय

४०० ते ५०० रुग्णशय्या क्षमता

रुग्ण पुनर्वसन केंद्र

फिजिओथेरपी केंद्र

रुग्णाच्या नातेवाइकांसाठी निवास व्यवस्था

एमएसआरडीसीकडून आधी खोडा

ससून रुग्णालयाशेजारी एमएसआरडीसीचा २.२ एकरचा भूखंड आहे. या भूखंडावर कर्करुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव होता. याबाबत तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व अधिकाऱ्यांना जाहीरपणे सूचनाही दिल्या होत्या. तरीही एमएसआरडीसीने हा भूखंड खासगी विकसकाला कवडीमोल भावाने दीर्घकालीन कराराने भाडेतत्त्वावर दिला. त्यामुळे एमएसआरडीसीच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्नही उपस्थित झाले. यामुळे कर्करुग्णालयाचा प्रस्ताव मागे पडला होता. आता त्याला पुन्हा गती मिळाली आहे.

पुण्यातील कर्करुग्णांची वाढती संख्या पाहता स्वतंत्र कर्करुग्णालय असण्याची आवश्यकता आहे. याबाबत आम्ही वैद्यकीय शिक्षण आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली होती. काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत दोन्ही अधिकाऱ्यांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पुढील आठवड्यात याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर केला जाईल. डॉ. एकनाथ पवार, अधिष्ठाता, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय

Story img Loader