पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) ४ सप्टेंबरला होणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२०चे प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. उमेदवारांना आयोगाच्या संके तस्थळावरून प्रवेशपत्र डाउनलोड करावे लागणार असून, परीक्षेसंदर्भात उमेदवारांना काही महत्त्वाच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला संयुक्त पूर्व परीक्षा २०२० पुढे ढकलावी लागली होती. त्यानंतर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून परीक्षा लांबणीवर पडली. त्यानंतर उमेदवारांनी आंदोलन के ल्यावर ११ एप्रिलला परीक्षा घेण्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा परीक्षा पुढे ढकलण्यात आली. आता ४ सप्टेंबरला ही परीक्षा घेण्याचे जाहीर करण्यात आले आहे. राज्यभरातील हजारो उमेदवारांनी या परीक्षेसाठी नोंदणी के ली आहे.

या पार्श्वभूमीवर आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकानुसार उमेदवारांना आयोगाच्या संके तस्थळावरून प्रवेशपत्र डाउनलोड करता येईल. त्याची मुद्रित प्रत (प्रिंट आऊट) घेता येईल. परीक्षा कक्षात प्रवेशासाठी उमेदवारांकडे प्रवेशपत्राची मुद्रित प्रत असणे आवश्यक आहे. ११ एप्रिलच्या परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र ग्राह्य धरले जाणार नाही. उमेदवारांनी परीक्षा सुरू होण्यापूर्वी दीड तास परीक्षा केंद्रावर आणि प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्याच्या एक तास आधी परीक्षा कक्षातील बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे. परीक्षा कक्षातील अंतिम प्रवेशासाठी निश्चित के लेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार नाही. करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आयोगाने प्रवेशपत्रावर दिलेल्या सूचनांचे आणि स्थानिक प्राधिकरणाने के लेल्या उपाययोजनांचे पालन करणे बंधनकारक असून, त्याचे उल्लंघन झाल्यास आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.