पुणे : दसरा आणि दिवाळीत मिठाईसह इतर खाद्यपदार्थांना मोठी मागणी असते. याचाच फायदा घेऊन काही विक्रेते खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करतात. अन्न व औषध प्रशासनाने पुणे विभागात अशा विक्रेत्यांवर कारवाई करून तब्बल २४ लाख रुपयांचे भेसळयुक्त खाद्यपदार्थ जप्त केले आहेत. याचबरोबर एका विक्रेत्याला व्यवसाय बंद करण्याची नोटीसही बजाविण्यात आली आहे.

दसरा व दिवाळीच्या काळात सार्वजनिक आरोग्य विचारात घेऊन अन्न व औषध प्रशासन विभागाकडून मोहीम राबविण्यात आली. जनतेस स्वच्छ, निर्भेळ अन्न प्राप्त व्हावे यासाठी अन्नसुरक्षा व मानदे कायदा २००६ नियमन २०११ अन्वये ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेंतर्गत पुणे जिल्ह्यात ४८ अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली. या आस्थापनांमधून दूध, खवा, पनीर, स्वीट मावा, तूप, बटर व नमकीन आदी खाद्यपदार्थांचे एकूण ५५ अन्ननमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. विश्लेषण अहवाल प्राप्त होताच कायद्याप्रमाणे पुढील कारवाई करण्यात येणार आहे. तसेच भेसळीच्या संशयावरून छापा टाकून विविध खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले. त्यात गाईचे तूप, बटर, स्वीट खवा व वनस्पती तूप आदी खाद्यपदार्थांचा एकूण १४ लाख ८८ हजार ३९८ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. याचबरोबर एका आस्थापनेस व्यवसाय बंदची नोटीस बजाविण्यात आली आहे.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…
New Spider Species Baner Hill, Baner Hill,
कोळ्याच्या नवीन प्रजातीचा बाणेर टेकडी येथे शोध, काय आहे वेगळेपण?
AI lawyer responds to CJI Chandrachud's question
CJI DY Chandrachud to AI Lawyer: “भारतात फाशीची शिक्षा…”, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा AI वकिलाला प्रश्न; उत्तराने झाले सर्वच अवाक
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
maharashtra assembly election 2024 mla mahesh landge warns opposition
पिंपरी- चिंचवड: लांडगे संतापले; “कार्यकर्त्यांला त्रास दिल्यास वीस तारखेनंतर चा महेश लांडगे डोळ्यासमोर ठेवा”; शांततेचा अंत…
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हेही वाच – अजितदादांच्या राष्ट्रवादीचे मावळचे उमेदवार आमदार सुनील शेळके यांच्यावर गुन्हा; ‘हे’ आहे कारण

तसेच, पुणे विभागामध्ये ८३ अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली. या आस्थापनांमधून दूध, खवा, पनीर, स्वीट मावा, तूप, बटर व नमकीन इत्यादी खाद्यपदार्थांचे एकूण १०२ अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. विश्लेषण अहवाल प्राप्त होताच कायद्याप्रमाणे पुढील कारवाई करण्यात येणार आहे. तसेच भेसळीच्या संशयावरून छापे टाकून विविध खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले. यात गाईचे तूप, बटर, स्वीट खवा व वनस्पती तूप आदी खाद्यपदार्थांचा एकूण ९ लाख १९ हजार ५२० रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. पुणे जिल्हा व विभागात एकूण २४ लाख ७ हजार ९१८ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला.

भेसळयुक्त पदार्थ

– दूध, खवा, पनीर, गाईचे तूप, बटर, स्वीट मावा, वनस्पती तूप, नमकीन

हेही वाचा – शहरबात : नेमेचि येते ‘आवाजा’ची दिवाळी!

जप्त पदार्थांची एकूण किंमत

२४ लाख ७ हजार ९१८ रुपये

सणासुदीच्या काळात विक्री करण्यात येणाऱ्या अन्नपदार्थांमध्ये भेसळीसंदर्भात काही संशय असल्यास नागरिकांनी टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ यावर संपर्क साधावा. भेसळयुक्त खाद्यपदार्थ विकणाऱ्या विक्रेत्यांवर सातत्याने कारवाई सुरू आहे. – सुरेश अन्नापुरे, सह आयुक्त, अन्न व औषध प्रशासन

Story img Loader