scorecardresearch

शिंदे-फडणवीस सरकारचा अर्थसंकल्प जाहीर होताच पुण्यात शिवसैनिकांनी पेढे आणि फटाके वाजवून केला जल्लोष

शिवसेना शहर प्रमुख नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली पेढे आणि फटाके वाजवून जल्लोष साजरा करण्यात आला

celebration after budget pune
(फोटो सौजन्य- लोकसत्ता टीम)

पुणे प्रतिनिधी: राज्याचा २०२३-२४ चा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मांडताच पुण्यातील सारसबाग समोरील शिवसेना भवना समोर शिवसेना शहर प्रमुख नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली पेढे आणि फटाके वाजवून जल्लोष साजरा करण्यात आला. तर यावेळी नागरिकांना पेढे देखील वाटले.

यावेळी नाना भानगिरे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार येऊन सात महिन्याचा कालावधी होऊन गेला आहे. त्या दरम्यान अनेक विकास काम सरकारने केली असून आज राज्यातील प्रत्येक घटक डोळ्यासमोर ठेवून आजचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला आहे.

आणखी वाचा- Maha Budget 2023: जातींच्या अस्मिता सुखावल्या, पण निधीचं काय? गिरीश कुबेरांचं विश्लेषण

त्यामध्ये पुणे शहर आणि जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने भरीव अशी तरतूद करण्यात आली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने भिडेवाडा उभारणे. स्वारगेट ते कात्रज मेट्रो प्रकल्प, रिंग रोड, नाशिक पुणे हाय स्पीड रेल्वे सुरू करणे. सारथी संस्थेचा विस्तार करणे आणि बालेवाडी येथे स्पोर्ट सायन्स सेंटरची उभारणी करणे. यासह अनेक प्रकल्पांना भरीव अशी तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्य सरकारचे आभार व्यक्त करण्यासाठी जल्लोष साजरा करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-03-2023 at 18:21 IST