लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाचे बांधकाम व्यावसायिक वडील विशाल अगरवाल, त्याची आई शिवानी यांच्यासह एकाला अतिरिक्त सत्र न्यायाधीश यू. एम. मुधोळकर यांनी चौदा दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

Wardha Zilla Parishad, Livestock Development Officer,
वर्धा : निलंबन रद्द! शासनास झाली उपरती अन…
Manorama Khedkar remanded in judicial custody for threatening a farmer in Mulshi with a pistol Pune
मनोरमा खेडकर यांची येरवडा कारागृहात रवानगी
Mumbai, High Court, police register, crime records, state government, Advocate General, Director General of Police, case quashing, negligence, Code of Criminal Procedure, court orders, document management
पोलीस डायरी सुस्थितीत ठेवण्यावरून उच्च न्यायालयाची नाराजी, वारंवार आदेश देऊनही दुर्लक्ष केल्याबद्दल खडसावले
high court, punishment due to non payment of fine
ही तर न्यायाची थट्टा! दंडाची रक्कम न भरल्याने अतिरिक्त शिक्षा भोगणाऱ्या आरोपीची तात्काळ सुटका करा, उच्च न्यायालयाचे आदेश
sc defers hearing manish sisodia s bail plea after judge recuses himself
सिसोदिया यांना जामिनाची प्रतीक्षाच; याचिकेवर सुनावणी करणाऱ्या न्यायमूर्तींची माघार
How did High Courts interpret the new criminal laws for the first time
नवे गुन्हेगारी कायदे लागू झाल्यानंतर जुन्या कायद्यानुसार दाखल गुन्ह्यांचे काय? न्यायालयांनी असा सोडवला पेच!
7-11 Bombing Case Accuseds appeal to be heard soon says High Court
७/११चा बॉम्बस्फोट खटला : आरोपींच्या अपिलावर लवकरच सुनावणी – उच्च न्यायालय
Vijay Mallya, Indian Overseas Bank,
इंडियन ओव्हरसीज बँकेशी संबंधित कर्ज बुडवल्याचे प्रकरण : सीबीआय न्यायालयाचे मल्ल्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट

कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी पोलिसांनी अगरवाल दाम्पत्यासह ससूनच्या न्यायवैद्यक शास्त्र विभागातील डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर, शिपाई अतुल घटकांबळे यांना अटक केली होती. तपासात बाल न्याय मंडळाच्या आवारात अगरवाल यांचा परिचित अश्फाक मकानदारने घटकांबळेला रक्त नमुने बदलण्यासाठी पैसे दिल्याचे उघड झाले. त्यानंतर मकानदारसह साथीदाराला अटक करण्यात आली.

आणखी वाचा-अखेर अजित पवार यांची कबुली… म्हणाले, ‘कांदा प्रश्नामुळे चार जिल्ह्यांत फटका…’

अगरवाल दाम्पत्यासह मकानदाराच्या पोलीस कोठडीची मुदत शुक्रवारी (१४ जून) संपली. त्यानंतर तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले. अल्पवयीन मुलाची वैद्यकीय तपासणी करण्यापूर्वी त्याच्या रक्ताचे नमुने बदलण्याबाबत अगरवाल दांपत्य आणि मकानदार यांच्यामध्ये एक बैठक झाली होती. बैठक कोठे झाली, तेथे कोण कोण उपस्थित होते, तसेच या बैठकीत अगरवाल दाम्पत्याने डॉ. अजय तावरे याच्याशी संपर्क साधला होता का?, यादृष्टीने तपास करायचा आहे. तपासासाठी आरोपी मकानदार याला तीन दिवसांची पोलीस कोठडी द्यावी. अगरवाल दाम्पत्याला चौदा दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवावे, अशी विनती तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांनी न्यायालयाकडे केली. सरकारी वकील सुनील कुंभार यांनी बाजू मांडली. अगरवाल दाम्पत्याच्या वतीने ॲड. प्रशांत पाटील, ॲड. हबीब मुलाणी, तसेच मकानदाराच्या वतीने ॲड. प्रसाद कुलकणी यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने अगरवाल दाम्पत्यासह मकानदारला चौदा दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्यानुसार न्यायालयाने तिघांची रवानगी येरवडा कारागृहात करण्याचे आदेश दिले.

आणखी वाचा-‘पक्षात काम करताना सर्वच गोष्टी मनासारख्या घडत नाही,’ छगन भुजबळ यांचे सूचक वक्तव्य

मकानदारची येरवडा पोलीस ठाणे, ससूनमध्ये उपस्थिती

पोलिसांनी या प्रकरणात सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. साक्षीदारांकडे चौकशी केली. चौकशीत मकानदार ससून रुग्णालय, येरवडा पोलीस ठाणे, बाल न्याय मंडळाच्या आवारात उपस्थित असल्याचे निष्पन्न झाले. रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट करण्यासाठी मकानदाराने अगरवाल दाम्पत्याकडून चार लाख रुपये घेतले होते. त्यापैकी एक लाख रुपये त्याने कोणाला दिले, याबाबत तो माहिती तो देत नसल्याचे सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांनी न्यायालयात सांगितले.