VIDEO : चवताळलेला बिबट्या पाणी टाकल्यावर झाला शांत

बिबट्याच्या हल्ल्यात चार कर्मचारी जखमी

 

जेरबंद केल्यानंतर चवताळलेल्या बिबट्याच्या अंगावर पाणी मारून शांत करावं लागलं.बिबट्याने मानवस्तीत शिरकाव केल्याने तेथील नागरिकांनी याची माहिती वनविभागाला दिली.त्यावेळी बिबट्याला पकडताना चार वन विभागाचे कर्मचारी बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाले होते.अखेर चवताळलेल्या बिबट्याला शांत करण्यासाठी अंगावर पाणी टाकावे लागले.ही घटना बुधवारी दुपारी अहमदनगर येथील लोणी,प्रवरा मेडिकल ट्रस्ट परिसरात घडली आहे.

पहा व्हिडिओ

अहमदनगर च्या लोणी,प्रवरा मेडिकल ट्रस्ट परिसरात अचानक बिबट्या दाखल झाला यामुळे मानवस्तीत भीतीचे वातावरण होते.तेथील नागरिकांनी वनविभागाला बिबट्या मानवस्तीत शिरल्याची माहिती दिली,त्यांनी घटनास्थळी येऊन बिबट्याला पकडण्याचे शर्थीचे प्रयत्न केले,पण यश येत नव्हते.अचानक वनविभागाच्या चार कर्मचार्यांवर बिबट्याने हल्ला चढवला यात ते जखमी झाले आहेत.हल्ला चढवल्यानंतर चवताळलेला बिबट्या सिमेंटच्या पाईपमध्ये घुसला.नंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यानी एक बाजू बंद करत दुसऱ्या बाजूने पिंजरा लावला.तेव्हा बिबट्याला पिंजऱ्यात पकडण्यात वनविभागाला यश आले.जेरबंद केलेला बिबट्या चांगलाच चवताळलेला होता.शेवटी अंगावर पाणी ओतून त्याला शांत करावं लागलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Aggressive leopard was calm down after water shower