पुण्यातील सेनापती बापट रोडवर एका हॉटेलमध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा एका कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी, सतत होत असलेल्या गॅस,पेट्रोल आणि डिझेलची दरवाढीच्या पार्श्वभूमीवर महिला काँग्रेसच्या पुणे शहर अध्यक्षा पूजा आनंद यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी स्मृती इराणी यांना चूल आणि बांगड्या देण्यात येणार होत्या,पण त्यापूर्वीच पोलिसांनी आंदोलनकर्त्या महिलांना ताब्यात घेतले.

‘हाय, हाय महंगाई मोदीजीने लाई!, जबसे भाजपा सत्ता में है आयी, कमरतोड महंगाई लायी।, क्योकि गॅस भी कभी सस्ती थी, स्मृती जी याद हैं ना? अशा घोषणा देखील यावेळी देण्यात आल्या.

“२०१४ पूर्वी रस्त्यावर उतरून महागाई विरोधात स्मृती इराणी यांनी जे आंदोलन केले होते त्या आंदोलनाची आठवण करून द्यायची आहे.  आज गॅस दरवाढ काय झाली आहे. त्यामुळे आमच्या महिला भगिनींना घर चालविणे मुश्किल झाले आहे. पण या महागाईवर एक महिला असलेल्या स्मृती इराणी कुठेच बोलताना दिसत नाही. ही निषेधार्थ बाब आहे. तसेच या महागाई विरोधात आज आंदोलन करत असून आम्हाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही निषेधार्थ बाब आहे”, असे आंदोलनकर्त्या पूजा आनंद यांनी सांगितले.