Premium

वाद टाळण्यासाठी अजित पवार मिरवणुकीला अनुपस्थित?

पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात सुरू असलेल्या शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी मानाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीला उपस्थित राहण्याचे टाळल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले.

ajit pawar
उपमुख्यमंत्री अजित पवार (संग्रहित छायाचित्र/ लोकसत्ता)

पुणे : पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात सुरू असलेल्या शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी मानाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीला उपस्थित राहण्याचे टाळल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मानाच्या गणपती मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, मुंबई येथील नियोजित कार्यक्रमामुळे अजित पवार पुण्यात आले नाहीत, असा दावा पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. पवार यांच्या सत्तेतील सहभागानंतर लगेचच ते पालकमंत्री होतील, अशी चर्चा सुरू झाली होती. विद्यमान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर त्यांनी कुरघोडी केल्याचे काही प्रकार पुढे आले होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ajit pawar absent from ganesh procession to avoid controversy ysh

First published on: 30-09-2023 at 02:43 IST
Next Story
सिंहगड रस्त्यावर उपाहारगृहचालकाचा खून; वैमनस्यातून खून झाल्याचा संशय