scorecardresearch

Premium

पक्षातील बंडखोरीनंतरही शरद पवार आणि प्रफुल्ल पटेलांचा एकत्र फोटो, चर्चांना उधाण, अजित पवार म्हणाले…

नव्या संसदेत सुरू झालेल्या अधिवेशनात अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार एकत्र आलेले दिसले.

Ajit Pawar on Sharad Pawar Praful Patel Photo
शरद पवार आणि प्रफुल्ल पटेलांचा फोटो व्हायरल झाल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले. त्यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली. (छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी होऊन अजित पवार यांच्या नेतृत्वात अनेक वरिष्ठ नेत्यांसह आमदारांचा मोठा गट भाजपाबरोबर सत्तेत सहभागी झाला. यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा गट आणि अजित पवार गटात जोरदार शाब्दिक युद्ध झालं. मात्र, नव्या संसदेत सुरू झालेल्या अधिवेशनात अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार एकत्र आलेले दिसले. त्यांचा एक फोटो व्हायरल झाला आणि त्यावरून राजकीय चर्चांना उधाण आलं. आता याबाबत अजित पवारांना पुण्यात विचारलं असता त्यांनी रविवारी (२४ सप्टेंबर) प्रतिक्रिया दिली.

अजित पवार म्हणाले, “मला शरद पवार आणि प्रफुल्ल पटेलांचा फोटोवर काहीही बोलायचं नाही. माध्यमं याचा फोटो आणि त्याचा फोटो असं विचारता. माझं ते काम नाही. तुम्ही विकासाबद्दल मला विचारा.”

ajit pawar
मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर असल्यानं नाराजीच्या चर्चा, अजित पवारांनी सोडलं मौन; म्हणाले, “आरे बाबा…”
jayant patil (
“मुलगा मोठा झाल्यावर स्वतंत्र घर बांधतो, परंतु…”, निवडणूक आयोगातील सुनावणीनंतर जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य
Nitin Gadkari in Washim 3
“…तर ठेकेदाराला बुलडोझरखाली फेकेन”; नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Vijay Vadettiwar
“सरकाने ओबीसी समाजाची बैठक बोलावली की भाजप समर्थकांची?” वडेट्टीवार यांचा प्रश्न

“प्रश्न सोडवण्यासाठी मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी एक भूमिका घेतली”

“मी सातत्याने महाराष्ट्रात फिरत असताना विकास करण्यासाठी, प्रश्न सोडवण्यासाठी मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी एक भूमिका घेतली आहे. माझं काम त्या पद्धतीने सुरू आहे. मी माझ्या ज्या बैठका घेतो आहे, आढावा घेतो आहे त्यात महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रश्नांना गती देतो आहे,” असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं.

“आढावा घेतला की अडचण आलेल्या कामाला गती मिळते”

“त्यासाठी १५ दिवसांनी, तीन आठवड्यांनी बैठका घेत असतो. ती कामं कशामुळे थांबली आहेत, का पुढे जात नाहीत, काय अडचणी आहेत हे सोडवतो. याचा आढावा घेतला की आपोआप त्या कामाला गती मिळते,” असंही अजित पवारांनी नमूद केलं.

हेही वाचा : “मुख्यमंत्र्यांसह १६ आमदारांची तिरडी बांधली आहे, आता फक्त…”; संजय राऊतांचा हल्लाबोल

“सध्या वाचाळवीरांची संख्याच वाढली आहे”

गोपीचंद पडळकरांनी केलेल्या टीकेबाबत विचारलं असता अजित पवार म्हणाले, “हा असं म्हटला, तो तसा म्हटला यावर मला बोलायचं नाही. सध्या वाचाळवीरांची संख्याच वाढली आहे. त्यांच्या वक्तव्यावर आपण काहीतरी वक्तव्य करणं ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही आणि परंपराही नाही. आपण आपलं काम करत रहायचं.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ajit pawar comment on sharad pawar praful patel photo in new parliament pbs

First published on: 24-09-2023 at 10:58 IST

संबंधित बातम्या

क्विझ ×