आज उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यातील मानाच्या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी आले होते. मानाचा पहिला कसबा गणपतीची आरती केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना तुतारी वाजली. यावेळी अजित पवार यांनी केलेल्या विधानाने उपस्थित नागरिकांमध्ये जोरदार हशा पिकला.

दीड वर्षापूर्वी शरद पवार यांची साथ सोडत अजित पवार हे काही आमदार सोबत घेऊन शिंदे, फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी झाले. या नव्या सरकारमध्ये अजित पवार हे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्रीपदावर विराजमान झाले. त्यानंतर अजित पवार यांनी थेट पक्षावर दावा करत पक्षाचे नाव आणि चिन्ह सर्व प्रक्रिया पार पडत मिळविले. तर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात पक्षातील वादावर न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. त्याच दरम्यान दुसर्‍या बाजूला शरद पवार यांच्या पक्षाला निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नाव दिले आणि तुतारी हे चिन्ह दिले. त्या सर्व झालेल्या राजकीय घडामोडीदरम्यान लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांचा महायुतीला अधिक फायदा होईल असे वाटत होते. मात्र त्या निवडणुकीत महाविकास आघाडीला सर्वाधिक जागांवर त्यांचे उमेदवार निवडून आणण्यात यश आले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये देखील महाविकास आघाडीला अधिक यश मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून राज्यभरात दौरे, मेळावे आणि बैठका घेतल्या जात आहे. त्याच दरम्यान गणेशोत्सव सुरू झाला असून पुणे शहरात विविध पक्षांचे नेतेमंडळी गणपतीच्या दर्शनासाठी येत आहेत.

LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Eknath shinde ajit pawar (2)
ShivSena vs NCP : “आजच्या घटनेमुळे शिंदे गट बदनाम झालाय”, अजित पवार गटाची टीका; महायुतीत वादाची ठिणगी?
Ajit Pawar, Ajit Pawar rebuked municipal commissioner,
“तुम्ही सगळं मुख्यमंत्र्यांकडे ढकलून देऊ नका”! तरुणीच्या अर्जावरुन अजित पवारांनी पालिका आयुक्तांना खडसावलं
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”
Narendra Modi Subhash Desai
Narendra Modi : “मला ८४ हजारांची पेन्शन मिळते, मोदींना किती रुपये मिळतील माहितीय का?”, सुभाष देसाईंनी सगळी आकडेवारी मांडली
Devendra Fadnavis Answer to Uddhav Thackeray
Devendra Fadnavis : ‘एक तर तू राहशील किंवा मी राहिन’, उद्धव ठाकरेंच्या आव्हानाला देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, “त्यांना वाटत असेल तर..”

हेही वाचा – गणेशोत्सवात चोरट्यांचा उच्छाद; कर्वेनगर, खडकीत महिलांचे दागिने चोरी

हेही वाचा – “तुम्ही सगळं मुख्यमंत्र्यांकडे ढकलून देऊ नका”! तरुणीच्या अर्जावरुन अजित पवारांनी पालिका आयुक्तांना खडसावलं

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे मानाच्या पाच गणपतीच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी अजित पवार यांनी मानाचा पहिला कसबा गणपतीचे दर्शन घेऊन आरती केली. त्यावेळी मानाचा पहिला कसबा गणपती मंडळामार्फत तुतारी वाजवणारी व्यक्ती त्या ठिकाणी येणार्‍या विशेष पाहुण्यांचे तुतारी वाजवून स्वागत करीत होती. त्याप्रमाणे अजित पवार हे आरती केल्यानंतर प्रसार माध्यमांसमोर बोलण्यास सुरुवात करणार त्याबरोबर तुतारी वाजविण्यात आली. अजित पवार तुतारी वाजविणार्‍या व्यक्तीला म्हणाले की, मी थांबविण्याचा प्रयत्न करतोय आणि तू वाजवतोय. असे म्हणताच उपस्थित नागरिकांमध्ये एकच हशा पिकला.