पुणे: दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल नव्या संसद भवनाचं उदघाटन सुरू होते.त्यावेळी दुसरीकडे भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात लैंगिक शोषणाच्या केल्या प्रकरणी महिला कुस्तीपटूं संसदे बाहेर आंदोलन करीत होत्या.त्यावेळी दिल्ली पोलिसांनी महिला कुस्तीपटूंना घेतले.त्यावरून केंद्र सरकार विरोधात अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्याबाबत अजित पवार विचारले असता ते म्हणाले की, आंदोलनकर्त्यां महिला कुस्तीपटूं पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर त्या हसत होत्या.अशा प्रकारचे काही फोटो सोशल मीडियावर समोर आले.पण मला एक वाटत की,सोशल मीडियाने वस्तुस्थिती मांडली पाहिजे.त्या खेळाडू असून त्या महिला खेळाडू कोणत्याही पक्षाच्या नाही. त्या राजकारण करीत नाही.अनेक दिवसापासून न्याय मिळावा याकरिता आंदोलन करित आहेत.या आंदोलनाची वरीष्ठ नेते किंवा क्रीडामंत्री नोंद घेतील आणि संसद भवनाच्या उदघाटन कार्यक्रमापूर्वी मार्गी लावतील अशी शक्यता होती.जर विषय ताणून द्यायचा नसेल आणि सामोपचाराने मार्ग काढायचा असेल तर चर्चेतून मार्ग निघू शकतो.हे अनेक घटनां मधून पाहत आलो आहे.अशा शब्दात केंद्र सरकारला महिला कुस्तीपटूं आंदोलनावरून अजित पवार यांनी सुनावले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar opinion on women wrestlers movement in delhi svk 88 amy
First published on: 29-05-2023 at 20:21 IST