पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला नऊ वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे.त्यावरून विरोधक विविध मत व्यक्त करीत आहेत.तर तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकीर्दीला ९ पैकी किती मार्क देताल.त्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की, मी अजून शिक्षकी पेशा स्विकारलेला नाही.
त्यामुळे मला मार्क वैगरे देता येणार नाहीत.ते मिडियाने शोधले पाहिजे.नऊ वर्षामध्ये काय झाले.२०१४ मध्ये काय सांगितले होते. पेट्रोल,डिझेल,गॅस सिलेंडरच्या काय किंमती होत्या. बेकारी किती होती.या सर्व गोष्टीच आत्मचिंतन आपणच करून जनते समोर ठेवावे अशी भूमिका यावेळी त्यांनी मांडली.



