चिंचवड विधानसभा मतदारसंघातून अखेर बंडखोर नाना काटे यांनी माघार घेतली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. सकाळपासूनच नाना काटे हे निवडणूक लढण्यावर ठाम होते. परंतु, दुसरीकडे अजित पवारांचा निर्णय हा अंतिम असल्याचे देखील नाना काटे यांनी म्हटलं होतं. त्यामुळे नाना काटे ही निवडणूक लढणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष होतं.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे बंडखोर नेते अजित पवारांचे निकटवर्तीय नाना काटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. नाना काटे यांना काही दिवसांपूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भेट घेऊन बंडखोरी शमवण्याचा प्रयत्न केला होता. महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांनी देखील नाना काटे यांच्याशी संपर्क साधून उमेदवारी मागे घेण्याबाबत चर्चा केली होती. याबाबत स्वतः काटे यांनी माहिती दिली. तसेच आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांनी देखील नाना काटे यांची भेट घेतली. अखेर माजी नगरसेवकांसोबत काटे यांनी बैठक घेऊन निवडणुकीतून माघार घेत असल्याचं स्पष्ट केल आहे. त्यामुळे शरद पवार गटाचे राहुल कलाटे विरुद्ध भाजपचे शंकर जगताप अशी थेट लढत होणार आहे.

Sada Sarvankar
Sada Sarvankar : “मला निवडणूक लढवावीच लागेल”, सदा सरवणकर हतबल; म्हणाले, “राज ठाकरेंनी माझी…”
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…
sharad pawar retirement (1)
Video: शरद पवारांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत, आता राज्यसभेतही जाणार नाही? भाषणात म्हणाले…
In Bhosari assembly former corporator Ravi Landge supported NCP candidate Ajit Gavane
भोसरी विधानसभा: बंडखोर रवी लांडगे आणि अजित गव्हाणे यांचं मनोमिलन भोसरीतील बंडखोरी शमली, रवी लांडगे उद्या उमेदवारी अर्ज माघारी घेणार
NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!
Manoj Jarange on Sambhajiraje
Chhatrapati Sambhajiraje : विधानसभा निवडणुकीतून मनोज जरांगेंची माघार; छत्रपती संभाजीराजे म्हणाले, “राजकीय दबाव…”
Uddhav Thackray Warns to Independent Candidates to take Back The Name
Uddhav Thackeray : “अपक्ष किंवा बंडखोरांनी अर्ज मागे घेतले नाहीत तर…”, उद्धव ठाकरेंचा इशारा
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हेही वाचा – पुणे: भाऊबीजेच्या दिवशी भाऊ-बहिणीला जीवदान, अग्निशमन दलाच्या जवानांची कामगिरी

हेही वाचा – गोखले संस्थेचे कुलगुरू डॉ. अजित रानडे यांचा राजीनामा

राहुल कलाटे हे चिंचवड विधानसभेसाठी चौथ्यांदा नशीब आजमावत आहेत. तर शंकर जगताप हे पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवत आहेत. दोघांपैकी चिंचवड विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Story img Loader