scorecardresearch

Premium

महाराष्ट्र सदनातील ‘त्या’ प्रकरणावरून अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला सुनावलं; म्हणाले, “मला एक प्रश्न पडतोय की…”

दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती निमित्त दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला

ajit pawar
अजित पवार

पुणे: दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती निमित्त दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला.पण या कार्यक्रमावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि सावित्रीबाई फुले यांचा अर्धपुतळा हटविण्यात आला.त्यावरून विरोधकांनी शिंदे फडणवीस सरकार वर टीका करण्यास सुरवात केली आहे.

त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार हे पुणे दौर्‍यावर होते.त्यावेळी त्या घटनेबाबत विचारले असता ते की,राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच सरकार आल्यापासून राज्यपाल, सरकारमधील मंत्री या सर्वांनी महापुरुषांचा अपमान करण्याच काम केले आहे.त्या विरोधात आम्ही सर्वांनी आंदोलन करित सरकारला जाब विचारण्याच काम केले.पण काल दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्यक्रमा दरम्यान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि सावित्रीबाई फुले यांचा अर्धपुतळा हटविण्यात आला.ते पुतळे हटविण्याच कोणतेही कारण नव्हते. या अशा घटना घडता कामा नये.मला एक प्रश्न पडतोय की,या घटना जाणीवपुर्वक केल्या जात आहेत का ? नजर चुकीने घडले का ? त्यामुळे मी त्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो आणि राज्यातील जनता या घटनेची निश्चित नोंद घेईल.अशा शब्दात शिंदे फडणवीस सरकारवर त्यांनी टीका केली.

asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
ajit pawar
‘दादा कचऱ्याची गाडी येत नाही’, भरकार्यक्रमात महिलेची तक्रार, अजित पवारांनी दिलं मिश्किल उत्तर, म्हणाले…
Old Malavani Aaji Writes Letter To Son After Ganpati Visit How Konkan Gets Lonely International Day Of Older Person Emotional
गणपतीला आलेला लेक, सून, नात मुंबईत निघून गेले, आणि मी पुन्हा वेडीच ठरले!
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ajit pawar questioned the shinde fadnavis government on issue in the maharashtra house svk 88 amy

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×