पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे हडपसर विधानसभा मतदारसंघात एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी एका तरुणीने वैद्यकीय मदत मिळविण्यासाठी महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडे अनेक वेळा अर्ज केले. मात्र कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही, म्हणून अजित पवार यांच्याकडे मदतीची मागणी केली.

हेही वाचा – पुणे : लष्कराच्या वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरची सव्वा कोटींची फसवणूक

हेही वाचा – ज्येष्ठ हास्य कलाकार दिलीप हल्याळ यांचे निधन

त्यावर अजित पवार उपस्थित अधिकारी वर्गाकडून नेमकी माहिती जाणून घेत होते. त्यावेळी मुख्यमंत्री साहाय्यता निधीकडे अर्ज करण्यात आल्याचे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी सांगितले. तुम्ही सगळं मुख्यमंत्र्यांकडे ढकलून देऊ नका, अशा स्पष्ट शब्दांत महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांना अजित पवार यांनी खडसावलं.