अजित पवारांनंतर पालकमंत्र्यांचाही भोसरी दौरा

आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून शहरातील राजकारण तापले आहे.

पालकमंत्री गिरीश बापट यांचा भोसरी दौरा आमदार महेश लांडगे यांनी घडवून आणला.

मंडळांच्या कार्यकर्त्यांना आकर्षित करण्यासाठी भाजप-राष्ट्रवादीत जोरदार चढाओढ

‘लक्ष्य २०१७’ डोळ्यासमोर ठेवून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी शहरभरात ‘गणेश मंडळ अभियान’ राबवले. त्यास प्रत्युत्तर म्हणून भाजपने पालकमंत्री गिरीश बापट यांचा आरती दौरा घडवून आणला. त्यामुळे मंडळांच्या कार्यकर्त्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी भाजप-राष्ट्रवादीतील चढाओढ लपून राहिलेली नाही.

आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून शहरातील राजकारण तापले आहे. राष्ट्रवादीच्या वतीने थेट अजितदादा यांनीच सूत्रे हाती घेतली आहेत. यापूर्वी कधीही न केलेला मंडळांच्या भेटीगाठीचा दौरा त्यांनी रविवारी केला.

दुपारी तीनपासून शहरात असलेल्या अजितदादांनी पक्षाशी संबंधित असलेल्या व नसलेल्या अनेक गणेश मंडळांना भेटी दिल्या. काही ठिकाणी आरती केली. त्यामुळे वातावरण ढवळून निघाल्याचे चित्र रविवारी दिसून आले.

तथापि, त्यांच्या या मंडळ अभियानास भाजपने सोमवारी प्रत्युत्तर दिले आहे. भाजपच्या वाटेवर असलेल्या आमदार महेश लांडगे यांनी पालकमंत्री बापट यांच्या दौऱ्याचे नियोजन केले. त्यानुसार, बापट यांनी सोमवारी भोसरीतील काही प्रमुख मंडळांच्या आरतीला हजेरी लावली. रात्री उशिरापर्यंत त्यांच्या मंडळांना भेटीगाठी सुरू होत्या. अजितदादा व बापट यांच्या लागोपाठच्या भेटीनंतर पुन्हा एकदा भाजप-राष्ट्रवादीतील चढाओढ दिसून आली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ajit pawar visit to bhosari

ताज्या बातम्या