Premium

पुणे : अखिल मंडई मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ नियोजित वेळेतच सायंकाळी विसर्जन मिरवणुकीत होणार सहभागी

अखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळासह हुतात्मा बाबू गेनू गणपती मंडळ आणि श्री जिलब्या मारुती गणपती मंडळ ट्रस्ट ही पुण्यातील प्रमुख गणपती मंडळे नियोजित वेळेत म्हणजेच सायंकाळी ६ नंतर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार आहेत.

Akhil Mandai Mandal pune
पुणे : अखिल मंडई मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ नियोजित वेळेतच सायंकाळी विसर्जन मिरवणुकीत होणार सहभागी (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

पुणे : अखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळासह हुतात्मा बाबू गेनू गणपती मंडळ आणि श्री जिलब्या मारुती गणपती मंडळ ट्रस्ट ही पुण्यातील प्रमुख गणपती मंडळे नियोजित वेळेत म्हणजेच सायंकाळी ६ नंतर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. कार्यकर्ते आणि भाविकांच्या भावना विचारात घेऊन दरवर्षीप्रमाणे यंदाही नियोजित वेळेतच विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार असल्याचे आज अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे शहरातील गणेशोत्सव देशभरात प्रसिद्ध असून हा उत्सव पाहण्यास अनेक भागांतून भाविक मोठ्या संख्येने येत असतात. तर या उत्सवात गणेश विसर्जन मिरवणूक सर्व भाविकांचे आकर्षण असते. पण ही विसर्जन मिरवणूक अनेक वर्षे सरासरी ३० तासांहून अधिक काळ चालत आली आहे. यामुळे प्रशासनावर अधिक ताण येतो. हे लक्षात घेऊन श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाने विसर्जन मिरवणुकीत दुपारी चार वाजता सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयामुळे अन्य गणेश मंडळ काय निर्णय घेतात. याकडे सर्वांचे लक्ष होते. त्या पार्श्वभूमीवर आज अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी पत्रकार परिषद घेऊन सदर माहिती दिली. या पत्रकार परिषदेला श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख पुनीत बालन, हुतात्मा बाबू गेनू गणपती मंडळ ट्रस्टचे बाळासाहेब मारणे, श्री जिलब्या मारुती मंडळ ट्रस्टचे भूषण पंड्या उपस्थित होते.

हेही वाचा – राज्यातील कायदा सुव्यवस्था चांगली राहू दे, ही गणरायापुढे केली प्रार्थना – अजित पवार

हेही वाचा – उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर…’

अण्णा थोरात म्हणाले की, पोलीस आणि प्रशासनाला सहकार्य करीत सर्व शिस्त पाळून लवकरात लवकर विसर्जन मिरवणूक संपविण्याचा सर्व मंडळांचा प्रयत्न राहील. आम्ही सर्व मंडळांना आजपर्यंत सहकार्य करित आलो आहे आणि पुढेदेखील सहकार्य करित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Akhil mandai mandal and shrimant bhausaheb rangari ganapati mandal will participate in the immersion procession in the evening at the scheduled time svk 88 ssb

First published on: 25-09-2023 at 14:03 IST
Next Story
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर…’