पुण्याच्या आळंदीमध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे कीर्तनात तल्लीन झाल्याचे पाहिला मिळालं. सुप्रिया सुळे यांनी गाथा परिवाराने आयोजित केलेल्या कीर्तन आणि प्रवचन प्रशिक्षणाच्या सांगता समारंभास हजेरी लावली होती. टाळ मृदुंगाच्या गजरात कीर्तन सादर झाल्यानंतर सुप्रिया सुळे कीर्तनात तल्लीन झाल्या. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या आळंदीत गाता परिवाराने आयोजित केलेल्या कीर्तन आणि प्रवचन प्रशिक्षणाच्या सांगता समारंभास आलेल्या आहेत. टाळ मृदंगाच्या गजरात कीर्तन सादर होत असताना स्वतः सुप्रिया सुळे या कीर्तनात तल्लीन झाल्याचे पाहायला मिळालं. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे देखील देहूत कीर्तन सोहळ्यात तल्लीन झाल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. त्यानंतर आता शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे कीर्तन ऐकतांना बघण्यास मिळत आहे. टाळ मृदंगाच्या तालावर सुप्रिया सुळे यांनी टाळ्या वाजवत कीर्तनात रमून गेल्या.